आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयटी क्षेत्रातील नोकर भरतीला ओहोटी...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सध्याच्या आर्थिक अनिश्चिततेचा फटका माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला बसला आहे. माहिती तंत्रज्ञान कंपन्यांनी खर्च कपातीच्या उपाययोजना हाती घेतल्यामुळे नोकर भरतीचे प्रमाण लक्षणीय घसरले असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
एप्रिल महिन्याच्या तुलनेत मे महिन्यात आयटी आणि आयटीईएस कंपन्यांमधील नोकर भरतीचे प्रमाण 29 टक्क्यांनी घटले असल्याचे मायहायरिंगक्लब.कॉमचे मुख्य कार्यकारी राजेश कुमार यांनी सांगितले, परंतु अन्य उद्योगांमधील नोकर भरतीचे प्रमाण एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात 13 ते 15 टक्क्यांनी वाढले असल्याचेही ते म्हणाले.
कंपन्यांनी खर्च कपातीच्या उपाययोजना सुरू केल्यामुळे आयटी आणि आयटीईएस क्षेत्रातील नोकºयांचे प्रमाण मंदावले असून हा कल आणखी काही महिने कायम राहण्याची शक्यता मनुष्यबळ विकास क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील नोकर भरतीचे प्रमाण कमी झालेले असले तरी कौशल्यावर आधारित कामाला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. खर्च कपातीबरोबरच प्रोजेक्ट आऊटसोर्सिंग हेदेखील एक कारण नोकर भरती घसरण्याच्या मागे असल्याचे सॅट एन मर्क मॅनपॉवरचे सल्लागार संचालक प्राची कुमार यांनी सांगितले. आर्थिक अनिश्चितता आणि राजकीय परिस्थितीचादेखील नोकर भरतीवर परिणाम होत असून हा काल आणखी काही महिने कायम राहण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. रुपयाच्या अवमूल्यनाचा भारतीय सॉफ्टवेअर निर्यातदारांना मोठ्या प्रमाणावर फायदा होत आहे, परंतु तरीही माहिती तंत्रज्ञान कंपन्यांमधील नोकर भरतीचा वेग मे महिन्यात कमी राहिल्याचे मत राजेशकुमार यांनी व्यक्त केले.
खोट्या पदवीमुळे गेली याहूच्या सीईओची नोकरी
नोकरी आहे, पण समाधान नाही
मनासारखी नोकरी मिळवण्यासाठी करा हा अचूक उपाय...
पदवी ऑक्सफर्ड विद्यापीठाची, नोकरी मात्र बारमध्ये वेटरची!