आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशातील विमानतळ सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - अनुभवहीनता आणि दक्ष सुरक्षा अधिका-यांच्या कमतरतेमुळे देशातील विमानतळांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी (बीसीएएस) च्या वतीने
घेण्यात आलेल्या दोन मूलभूत चाचण्यांमध्ये 94 टक्के अधिकारी नापास झाले आहेत.

गेल्या महिन्यात 8 ते 21 तारखेदरम्यान ही चाचणी घेण्यात आली. यामध्ये इंडिगो, एअर इंडिया, स्पाइसजेट आणि सीआयएसएफच्या 103 अधिका-याची चाचणी घेण्यात आली. यापैकी 97 अधिकारी नापास झाले. त्यापूर्वी 19 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर 2012 दरम्यान घेतलेल्या चाचणीत 111 पैकी 51 अधिकारी पास झाले होते. अनुत्तीर्ण झालेल्या सर्र्व अधिका-याना पुन्हा चाचणी द्यावी लागणार आहे.

या कंपन्या नापास स्पाइसजेटचे 4, इंडिगोचा 1, एअर इंडियाच्या 23 अधिका-यानी ही चाचणी दिली, हे सर्र्व अधिकारी नापास झाले आहेत. केंद्रीय सुरक्षा एजन्सीचे अधिकारीही या चाचणीत चांगली कामगिरी करू शकले नाहीत. या एजन्सीच्या 26 सुरक्षा अधिका-यानी ही चाचणी दिली होती. यापैकी फक्त 3 अधिकारी उत्तीर्ण झाले.