Home »National »Delhi» Intellegence Give Terror Attack Alert,But Not Correct - Home Minister

घातपाताबद्दल गुप्तचरांनी इशारा दिला होता , परंतु माहिती अचूक नव्‍हती - गृहमंत्री

वृत्तसंस्था | Feb 23, 2013, 07:54 AM IST

  • घातपाताबद्दल गुप्तचरांनी इशारा दिला होता , परंतु माहिती अचूक नव्‍हती -  गृहमंत्री

नवी दिल्ली/हैदराबाद - हैदराबादेतील बॉम्बस्फोटांवरून शुक्रवारी संसदेत विरोधी पक्षांनी गदारोळ करत केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना चांगलेच धारेवर धरले होते.यावर खुलासा करताना शिंदे यांनी सांगितले की, या घातपाताबद्दल गुप्तचरांनी इशारा दिला होता, परंतु अचूक माहिती नव्हती. यावर, माहिती मिळूनही सरकार या आघाडीवर वारंवार अपयशी का ठरते, असा प्रश्न करत विरोधक आक्रमक झाले. तत्पूर्वी गृहमंत्री शिंदे यांनी हैदराबादचा दौरा केला. लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी हा चिथावणीखोर भाषणांचाच हा परिपाक असू शकतो, अशी शंका व्यक्त केली.
मृतांची संख्या 16 वर
हैदराबादच्या दिलसुखनगरमध्ये गुरुवारी सायंकाळी झालेल्या दोन बॉम्बस्फोटांतील जखमींपैकी आणखी चौघांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 16 झाला आहे.. शहरातील विविध रुग्णालयांमध्ये 117 जखमींवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी चौघांची प्रकृती गंभीर आहे.
नक्वी यांना धमकी
भाजप नेते मुख्तार अब्बास नक्वी यांना ‘जमात-उद-दवाचा म्होरक्या हाफिज सईदविरुद्ध बोललात तर गंभीर परिणाम होतील’, असे धमकावण्यात आले आहे. आंतरराष्‍ट्रीय कॉलवरून त्यांना ही धमकी देण्यात आली. तशी तक्रार त्यांनी गृहमंत्री शिंदे यांच्याकडे केली आहे.
अमोनियम नायट्रेटचा वापर
एनआयएनुसार हैदराबादच्या स्फोटासाठी वापरण्यात आलेल्या बॉम्बमध्ये अमोनियम नायट्रेटचा वापर करण्यात आला होता. स्फोटाच्या ठिकाणी काही बॉल बेअरिंग सापडल्या आहेत. 2007 मध्ये हैदराबादेत झालेल्या स्फोटांतही अशाच प्रकारचे साहित्य वापरण्यात आले होते. तेव्हा रिमोट कंट्रोलने हे स्फोट घडवले होते.

Next Article

Recommended