आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मग आंतरजातीय विवाहितांच्या मुलांनाही आरक्षण द्या- सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - आंतरजातीय विवाह करणार्‍या दाम्पत्याच्या मुलांना त्यांचे आई किंवा वडील हे उच्चवर्णीय जातीतील असल्याचे म्हणत आरक्षण नाकारता येत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिला.
गुजरात सरकारच्या निर्णयाविरुद्ध रमेशभाई दाभाई नाइका यांच्या याचिकेवर सुनावणी अनुसूचित जाती कोट्यातील आरक्षणाचा फायदा मिळवून द्यावा, असा निर्णय दिला. नाइकांचे वडील क्षत्रिय जातीचे असल्याचे सांगत सरकारने आरक्षणास नकार दिला होता.
न्यायालयाने आपल्या निर्णयात सांगितले की, दोन वेगवेगळ्या जातींतील महिला-पुरुषात लग्न होऊ शकते. या संबंधांतून होणार्‍या मुलाची जात ही वडीलांचीच समजली जाण्याची शक्यता असते. पिता जेव्हा उच्चवर्णीय जातीतून असतो, तेव्हा ही शक्यता वाढते. मात्र ही शक्यताच निष्कर्ष असल्याचे समजावे, याचे कोणतेही कारण नाही.