आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्याजदर कपातीवर पाणी - डी. सुब्बाराव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - महागाई अजूनही उच्च पातळीवरच आहे. त्यामुळे कोणत्याच पातळीवर हलण्यास जागा नाही, असे सांगत रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) व्याजदर कपातीच्या अपेक्षेवर पाणी फेरले. आर्थिक पातळीवर कोठेच हलण्यास वाव नाही, असे मत आरबीआयचे गर्व्हनर डी. सुब्बाराव यांनी व्यक्त केले.

ते म्हणाले, आर्थिक वाढ मंदावल्यानंतर आम्ही मौद्रिक तसेच वित्तीय पातळीवर दिलासा देण्याचा प्रयत्न करतो. मात्र, सध्या वित्तीय तसेच मौद्रिक पातळीवर स्थिती कडक आहे. तेथे थोडाही वाव नाही. रिझर्व्ह बँक 29 जानेवारी रोजी तिमाही आढावा व धोरण जाहीर करणार आहे. डिसेंबरमध्ये घाऊक महागाईने तीन वर्षांचा नीचांक गाठला. यामुळे आरबीआय व्याजदरात कपात करेल अशी शक्यता व्यक्त होत होती. डी. सुब्बाराव यांनी महागाई उच्चस्तरावर असल्याचे सांगितल्याने व्याजदर कपातीच्या आशा मावळल्या आहेत.