आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Internet and through newspaper ran a high profile sex racket

इंटरनेट आणि वृत्तपत्रांच्या माध्यमातून चालायचे हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीला लागून असलेल्या सायबर सिटीच्या उच्चभ्रू भागातील हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा भांडाफोड झाला. इंटरनेट आणि वृत्तपत्रांच्या माध्यमातून या सेक्स रॅकेटसाठी गि-हाईक शोधले जायचे, अशी माहिती पुढे आली आहे.
डीएफएफ फेज-दोनच्या गेस्ट हाउसमध्ये चालणा-या सेक्स रॅकेटमध्ये पकडण्यात आलेल्या चार भारतीय मुलींसह एका रशियन कॉल गर्लला शनिवारी पोलिसांनी न्यायदंडाधिका-यांसमोर उभे केले. न्यायदंडाधिका-यांनी पाचही जणींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. पोलीस आता सेक्स रॅकेटच्या मास्टर माइंडचा शोध घेत आहेत. गेस्ट हाउसचा संचालकही अजून पोलिसांच्या हाती लागला नाही.