आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारतातील इंटरनेट, ब्रॉडबँड सेवा महागणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नवी दिल्ली - नवीन परवाना प्रणालीमध्ये दूरसंचार खात्याने प्रवेश मोठे प्रवेश शुल्क प्रस्तावित केल्यामुळे इंटरनेट आणि ब्रॉडबँड सेवेचे दर वाढण्याची शक्यता असल्याचे आयएसपीएआय या औद्योगिक संघटनेने म्हटले आहे. दूरसंचार खात्याने राष्ट्रीय स्तरावरील एकीकृत परवान्यासाठी एकरकमी 15 कोटी रुपये प्रवेश शुल्क प्रस्तावित केले आहे. सध्या इंटरनेट सेवा प्रदात्या कंपन्या 30 लाख रुपये शुल्क भरतात.एकिकृत परवाना प्रणालीत दूरसंचार खात्याने नवीन काहीच केले नाही. जुन्याच परवाना पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे. केवळ नवीन राष्ट्रीय एकीकृत परवाना शुल्क प्रस्तावित करण्यात आले आहे. जर सेवाप्रदात्यांनी हे शुल्क भरले तर इंटरनेट आणि ब्रॉडबँडसेवेचे दर आपोआपच वाढतील, असे भारतीय इंटरनेट सेवा प्रदाता संघटनेचे अध्यक्ष राजेश चावरिया यांनी म्हटले आहे. दूरसंचार खात्याने इंटरनेट टेलिफोनीला परवानगी दिली पाहिजे. असे ते म्हणाले.