आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Is Parliamentarian As Terrorist In Parliament ; Sushma Swaraj Ask Shinde

मग संसदेत काय अतिरेकी बसतात? : सुषमा स्वराज यांचा शिंदेना प्रश्‍न

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- हिंदू दहशतवादावर गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर भारतीय जनता पक्षाने देशभर आंदोलन छेडले आहे. गुरुवारी अनेक शहरांत जोरदार निदर्शने करण्यात आली. गृहमंत्री शिंदे यांना जोवर बडतर्फ केले जात नाही तोवर आंदोलन सुरू ठेवण्याची घोषणा स्वराज यांनी केली. भारतीय संसदेत अतिरेकी बसले असल्याचे आपण जगाला दाखवून देऊ इच्छित आहात का?, असा सवालही त्यांनी केला. दरम्यान, शिंदे पदावर कायम राहिले तर संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा राजनाथसिंह यांनी दिला आहे.