आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली- शाहरुख खानच्या लेखावरुन भारताला सल्ले देणा-या पाकिस्तानचे एक नीच कृत्य समोर आले आहे. भारतीय जवानाचा शिरच्छेद करणा-याला पाकिस्तानने 5 लाख रुपयांचे बक्षीस दिले आहे. एका गोपनीय अहवालातून ही बाब उघड झाली आहे. भारताने अद्याप याबाबत प्रतिक्रीया दिली नाही.
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर मेंढर येथे दोन भारतीय जवानांची हत्या करण्यात आली होती. त्यापैकी शहिद हेमराजचे शिर कापून नेण्यात आले. या कृत्यामागे लष्कर-ए-तोयबाचा हात असल्याचे उघड झाले आहे. लष्करच्या दहशतवाद्यांना आयएसआय आणि पाकिस्तानी सैन्याचे सहकार्य होते. त्यांनी हल्ला करुन भारतीय जवानांची हत्या केली. तसेच शहिद हेमराजचे शिर कापून पाकिस्तानात नेले. हे काम करणा-या अनवर खान या दहशतवाद्याला आयएसआय आणि पाकिस्तानी सैन्याने 5 लाख रुपयांचे बक्षीस दिले आहे. आयबी आणि रॉ यांनी सैन्याच्या गुप्तचर विभागासोबत तयार केलेल्या अहवालात हा उल्लेख करण्यात आला आहे.
अहवालातील माहितीनुसार, पाक सरकार आणि आयएसआयच्या अधिका-यांनी ही योजना आखली होती. त्यात लष्कर-ए-तोयबाचे 10 आणि जैश-ए-मोहम्मदचे 5 दहशतवादी सहभागी होते. पाकव्याप्त काश्मिरमधील आयएसआयच्या टाटापानी युनिटचे सुभेदार जब्बार खान यांनी पाकिस्तानी सैन्याच्या मुजाहिद रेजिमेंटच्या मदतीने भारतीय सैनिकाच्या हत्येचे कृत्य केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.