आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jagdish Shetter Will Take Oath As A Cm Of Karnataka

कर्नाटकमध्ये जगदीश शेट्टर आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळूरू- 11 महिन्यांच्या सत्तासंघर्षानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री डी.बी. सदानंद गौडा यांना बुधवारी राजीनामा देणे भाग पडले. याबरोबर जगदीश शेट्टर यांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान जमीन वाटप घोटाळ्यात सहभागी झाल्याची तक्रार शेट्टरविरुद्ध देण्यात आली आहे. शेट्टर गुरुवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील.
कर्नाटकमध्ये 11 महिन्यात शेट्टर तिसरे मुख्यमंत्री होणार आहेत. माजी मुख्यमंत्री बी.एस. येदियुरप्पा यांचा त्यांना पाठिंबा आहे. मे 2013 मध्ये विधानसभा निवडणूक होणार असल्याने त्यांना 11 महिन्यांचा कार्यकाळ मिळणार आहे. त्याआधी सदानंद गौडा यांनी राज्यपाल हंसराज भारद्वाज यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सोपवला. घरातून बाहेर पडताना समर्थकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी बळाचा वापर करून कार्यकर्त्यांना हटवले. राजभवनमध्ये जातानाही असेच दृश्य दिसून आले.
शेट्टर व त्यांच्या मंत्रिमंडळाला माझ्या शुभेच्छा. राज्याच्या समस्या सोडवण्यासाठी ईश्वराने त्यांना शक्ति द्यावी, असे मावळते मुख्यमंत्री सदानंद गौडा यांनी म्हटले आहे.
शेट्टरविरुद्ध आरोप- जगदीश शेट्टर यांच्याविरुद्ध लोकायुक्त न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामध्ये शेट्टर यांनी सरकारकडून शहरात खरेदी केलेली 188 एकर जमीन अधिसूचित करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या मंजुरीविना घेतला. त्यामुळे सरकारचे मोठे नुकसान झाले. 2006 मधील हे प्रकरण असून त्यावेळी शेट्टर जनता दल (एस) , भाजप आघाडी सरकारमध्ये महसूलमंत्री होते. एस. एम. चेतन या विद्यार्थ्याने ही तक्रार दिली आहे. माजी मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा यांच्याविरुद्धही लोकायुक्त न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे गेल्यावर्षी त्यांना खुर्चीवर पाणी सोडावे लागले होते.