आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुलाबी जयपूर देशातील पहिले वाय-फाय शहर होणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर- जगप्रसिद्ध पर्यटन शहर जयपूर सिटीचे अत्याधुनिक वाय-फाय सिटीमध्ये रुपांतर होणार आहे. वाय-फाय सिटी बनवण्यासंदर्भात राजस्थान सरकारकडून यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशानात घोषणा अपेक्षित आहे. या योजनेसाठी साधारण 10 कोटी रुपये खर्च लागेल असा अंदाज आहे. यामुळे लोक इंटरनेटचा मोफत वापर करू शकतील. वाय-फाय नेटवर्कसाठी 300 हून अधिक सरकारी व खासगी इमारतींवर वाय-फाय हॉट स्पॉट तयार केले जातील. याअंतर्गत शहरातील प्रत्येक भाग वाय-फायअंतर्गत येईल. या सुविधेचा लाभ वाय-फाय एनेबल्ड लॅपटॉप, मोबाइल व अन्य उपकरणांमध्ये करता येऊ शकेल. युजरला 2 एमबीपीएसच्या प्रतियुजरप्रमाणे स्पीड मिळेल. इंटरनेटच्या चांगल्या स्पीडमुळे व्हिडिओ पाहिले जाऊ शकतात तसेच डाऊनलोडिंग, ई-मेल आणि इंटरनेट सर्फिंगही करता येईल. याचा खर्च राज्य सरकार करणार आहे.

आव्हान असेल मात्र पर्याय तयार

> सुरक्षेच्या दृष्टीने युजरची ओळख आवश्यक
सल्ला : युजरने केलेल्या मेसेजद्वारे मोबाइल किंवा आयपी रजिस्टर होईल आणि इंटरनेटशी संबंधित माहिती सुरक्षेच्या दृष्टीने सर्व्हिस प्रोव्हायडरकडे पाठवली जाईल.

> युजर गैरवापर करत असेल अशा स्थितीत काय?
सल्ला : यासाठी कंटेंट मॅनेजमेंट सिस्टिम काम करेल. धमकी देणारा ई मेल लिहिल्यानंतर किंवा अन्य गुप्त माहितीची देवाणघेवाण होत असेल तर सिस्टिम सक्रिय होईल आणि सर्व्हिस प्रोव्हायडरला याची माहिती देईल.

02 एमबीपीएस प्रतियुजरप्रमाणे स्पीड मिळणार

अ‍ॅक्सेस असे करू शकाल
युजर आपल्या मोबाइल, लॅपटॉप किंवा अन्य एनेबल्ड उपकरणातून वाय-फाय ऑप्शनशी जोडला गेल्यानंतर एक युनिक कोड फ्लॅश होईल. हा कोडचा मेसेज विशेष क्रमांकावर करावा लागेल. यावर एक तास किंवा ठरलेल्या वेळेपर्यंत इंटरनेट अ‍ॅक्सेस मिळवू शकता. यानंतर ही सुविधा पाहिजे असल्यास पैसे द्यावे लागतील.

वाय-फाय सुविधेवर विचार सुरू आहे. मात्र, याबाबत अद्याप मला फार माहिती नाही.
ए. एम. देशपांडे, अ‍ॅडिशनल डायरेक्टर, डिपार्टमेंट ऑफ इंफॉर्मेशन अ‍ॅँड टेक्नॉलॉजी, राजस्थान सरकार

अद्याप कोणतीही फ्री वाय-फाय सिटी नाही : देशात अद्याप कोणतेही शहर फ्री वाय-फाय सिटी म्हणून अस्तित्वात आले नाही. आठ वर्षांपूर्वी म्हैसूरमध्ये वाय-फाय स्पॉट लावण्यात आले होते. सहा वर्षांपूर्वी पुण्याला वाय-फाय शहर बनवण्याची योजना होती. यासाठी खासगी कंपन्यांना 250 रुपये प्रतिमहिना युजर चार्ज आकारले जाणार होते. जयपूरला वाय-फाय सिटी घोषित केल्यानंतर हे सरकारच्या प्रयत्नातून साकारलेले पहिलेच फ्री वाय-फाय शहर ठरणार आहे.