आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजयपूर- गुलाबी नगरी म्हणून ओळखल्या जाणार्या जयपूर शहरात गुलाबी थंडीत सहाव्या 'जयपूर लिटरेचर फेस्टिव्हल'ला आज (गुरुवारी) मोठ्या दिमाखदार सोहळ्याने प्रारंभ झाला. पाच दिवसीय हा साहित्यिकाचा महासोहळ्यात साहित्यापेक्षा वादामुळेच प्रसिद्ध आहे. संमेलनास महाश्वेता देवी, बुद्ध धर्मगुरु दलाई लामा, बॉलिवूड अभिनेत्री शर्मिला टागोरसह अनेक लेखक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. 174 चर्चा सत्रांमध्ये में तब्बल 280 पेक्षा जास्त साहित्यिक, लेखक, कलाकार सहभागी होणार आहेत.
मागील काही वर्षांपासून हे फेस्टिव्हल साहित्यापेक्षा वादांमुळेच चर्चेत आले आहे. व्यासपीठावर खुलेआम मद्यपान करणे, वादग्रस्त लेखकांच्या पुस्तकांवर चर्चा होणे, अशा एक ना अनेक कारणांमुळे जयपूर फेस्टिव्हल प्रसिद्ध आहे. प्रायोजकांकडून मानवाधिकाराचे उल्लंघन केल्याचा मुद्दाही यापूर्वी फारच गाजला होता.
यंदाही अपेक्षेप्रमाणे जयपूर फेस्टिव्हल अपवाद राहीले नाही. फेस्टिव्हलची सुरुवात वादानेच झाली आहे. पाकिस्तानी लेखकांना आमंत्रित केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुलटे आहे. तसेच वादग्रस्त लेखकांना या वर्षी पुन्हा का आमंत्रित केले? असा सवाल अनेक हिंदू आणि मुस्लिम संघटनांनी आयोजकांना विचारला आहे.
वादग्रस्त लेखक सलमान रुश्दी यांना देखील यंदा आयोजकांनीब बाजुला केले आहे. आयोजकांनुसार त्यांनी लेखक अमिताव कुमार आणि हरि कुंजरू यांची नावे निमंत्रिकांच्या यादीत नसल्याने त्यांना आमंत्रित करण्यात आलेले नाही. मात्र, जीत थईल यांना बोलावण्यात आलेले आहे. आयोजकांच्या मते त्यांना यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. तसेच त्यांना मॅन बुकर पुरस्कारही जाहीर झाला आहे.
वादग्रस्त लेखकांच्या सहभागावरून मुस्लिम संघटनेसह भाजप युवा मोर्चाने देखील आयोजकांच्या विरोधात दंड थोपटले आहे. अझीमुशान अजमत-ई-नमूसी-ई-रसूल यांनी तर फेस्टिव्हलच्या आयोजकांना धमकी दिली आहे. जीत थाईल, रूचिर जोशी, हरी कुंजरू आणि अमिताव कुमार यांना मुस्लिम संघटनांनी विरोध केला आहे. पाकिस्तानी सैन्याने सिमेवरील दोन भारतीय सैनिकांचे शिर कापल्यामुळे भाजयुमोने पाकिस्तानी लेखकांच्या सहभागाला विरोध दर्शविला आहे. पाकिस्तानी साहित्यिक जर या संमेलनात सहभागी होत असतील तर होणार्या अनुचित प्रकारास आयोजकच जबाबदार राहतील, असा इशाराही भाजयुमोने दिला आहे.
दरम्यान, 24 ते 28 जानेवारी दरम्यान या काळात जयपुरातील डिग्गी हाऊस या ठिकाणी होणारा हा साहित्याचा उत्सव सर्व साहित्य रसिकांसाठी खुला आहे. भारतीय भाषांमधील साहित्यावर विशेष चर्चासत्रे होणार आहेत. विख्यात मराठी साहित्यिक भालचंद्र नेमाडे या वेळी उपस्थित राहणार मराठी, मल्याळम, तेलुगू, मैथिली, पंजाबी, गुजराती, सिंधी, कन्नड, काश्मिरी, बांगला आदी सोळा भारतीय भाषांमधील साहित्यावर या उत्सवात चर्चा होणार आहे.
अंबई, डायना एक, कांचा इलय्या, जावेद अख्तर, नीलेश मिश्र, पिको अय्यर, गुलजार आदी भारतीय लेखकांसह त्यात हार्वर्ड जेकबसन, लिंडा गँरट, एलिझाबेथ गिल्बर्ट, ओरलँडो फिगेस, सायमन आर्मिटेज, झो हेलर आदी साहित्यिक सहभागी होणार आहेत. हिंदी इंग्लिश भाईभाई, लोकगीते, बॉलीवूडची नवी संस्कृती हे काही चर्चासत्रांचे विषय आहेत. नुकतेच दिवंगत झालेले प्रख्यात बंगाली साहित्यिक सुनील गंगोपाध्याय यांच्यावर एक विशेष कार्यक्रम होणार आहे. सुनीलदांनी फेस्टिव्हलला उपस्थित राहण्याचे आश्वासन आयोजकांना दिले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.