आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारण्यांना मेणबत्ती मोर्चापेक्षा मतांची काळजी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - मेणबत्ती मोर्चांची राजकारण्यांना चिंता वाटत नाही.त्यापेक्षा तुमच्या मतांची अधिक काळजी त्यांना वाटते अशा शब्दात जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी तरुणांसमोर खरेखुरे मत व्यक्त केले.
संयुक्त राष्ट्राच्या माहिती केंद्रांच्या वतीने तरुणांसाठी आयोजित ‘यंग चेंजमेकर्स कॉन्क्लेव्ह ’कार्यक्रमात बोलताना ओमर यांनी मेणबत्ती मोर्चाबद्दल प्रांजळपणे मत व्यक्त केले. दिल्ली गँगरेपप्रकरणानंतर जंतर मंतर आणि इंडिया गेटसह देशभरात अनेक ठिकाणी मेणबत्ती मोर्चे निघाले होते.या पार्श्वभूमीवर ओमर यांनी मेणबत्ती मोर्चाच्या नव्या क्रेझ बद्दल आपले मत व्यक्त केले. तुम्हाला आवडो अथवा न आवडो पण राजकारण्यांना मेणबत्ती मोर्चाबद्दल फारशी चिंता वाटत नाही. राजकारण्यांनी मेणबत्ती मोर्चांची दखल घ्यावी असे मलाही वाटते, पण त्यापेक्षा तुमच्या मतांची त्यांना अधिक काळजी वाटते.ओमर यांनी असे सडेतोड प्रतिपादन करताच उपस्थित चकित झाले. सर्वसाधारणपणे एका विशिष्ट काळानंतर जनतेचा संताप टिकत नाही.असे राजकारण्यांचे मत आहे. बदल करायचा असल्यास पुढे येऊन आवाज उठवा तरच बदल घडवता येईल असे ओमर म्हणाले.