आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नंदनवनातील दहशतवादाचा ‘बर्फ’ वितळला, जम्मू - काश्मीरमध्ये 200 अतिरेकी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - एकेकाळी अतिरेक्यांचे ‘नंदनवन’ ठरलेल्या जम्मू - काश्मीरमध्ये सध्या शांतता नांदत आहे. गेल्या काही वर्षांत खो-यातील अतिरेकी कारवाया आणि अतिरेक्यांची संख्या यात कमालीची घट झाली आहे. सध्या काश्मीरमध्ये केवळ 200 अतिरेकी आहेत, असे सुरक्षा दलाने म्हटले आहे.
पाक पुरस्कृत दहशतवाद आणि सीमेपलीकडून होणा-या घुसखोरीमुळे जम्मू - काश्मीर अतिरेकी कारवायांचा बळी ठरले होते. तब्बल अडीच दशके काश्मीर दहशतवादाच्या आगीत होरपळत होते. परंतु सध्या तेथील अतिरेकी कारवाया व त्यांच्या दहशतीचा बर्फ ब-याच प्रमाणात वितळला आहे. काश्मीरचे खोरे पर्यटकांनी पुन्हा बहरले आहे. काश्मीरच्या खो-यात दहशतवाद प्रचंड प्रमाणात होता त्या 1990 ते 2000 या दशकात तेथे 4000 पेक्षा जास्त दहशतवादी होते. आता परिस्थिती पूर्णपणे पालटली असून दहशतवाद नियंत्रणात आहे. आजच्या स्थितीत तेथे केवळ 200 अतिरेकी आहेत असे सुरक्षा यंत्रणेने स्पष्ट केले आहे. गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले की एका दशकात अतिरेक्यांची संख्या 700 पेक्षा कमी कधीच आलेली नव्हती. त्यामुळे खो-यात केवळ 200 अतिरेकी असणे ही मोठी उपलब्धी आहे.
एका अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार पाक अडकला अंतर्गत भानगडीत: खो-यातील दहशतवादी कारवायांमध्ये घट येण्याचे एक कारण पाकिस्तान असून पाकमधील अंतर्गत घडमोडी वेगात आहेत. तेथील नेते, पक्ष, कट्टरपंथी नेते अंतर्गत कारवायांमध्ये गुरफटले आहेत. अशा कारवांसाठी लागणारा पैसाही आता पूर्वीसारखा उपलब्ध व्हायला तयार नाही. युवक आणि शस्त्रास्त्रेही उपलब होत नाही. काश्मीरमधील नागरिक आता पूर्वीप्रमाणे दहशतवादाला समर्थन देत नाहीत. यामुळे घातपाती कारवायांत मोठी घट झाली आहे.
बहुतांश अतिरेकी पाकिस्तानीच
सध्या काश्मीरमध्ये असलेले अनेक अतिरेकी हे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील आहेत. पंजाब प्रांत हा लष्कर ए तोयबाचा गड समजला जातो. दहशतवाद ज्या वेळी शिखरावर होता त्या वेळी खो-यात लष्करसह चेचेन्या, तालिबानी, अफगाणिस्तान, सुदान पॅलेस्टाइन आदी देशांमधून अतिरेकी पाठवण्याचे प्रयोग झाले. परंतु त्यात सातत्य राहिले नाही. तालिबान व लादेनच्या मृत्यूमुळेही यात खंड पडला आहे. दहशतवादी घटनांमध्ये घट झाल्याने विदेशी संघटनांच्या अतिरेक्यांचा काश्मीर खो-यातील हस्तक्षेपही बंद झाला आहे.