Home »National »Other State» Javed Akhtar Slams Bollywoods New Generation

वागण्या-बोलण्यातच तारतम्य नसेल तर दर्जेदारपणा कसा टिकेल?- जावेद अख्तर

दिव्य मराठी वेब टीम | Jan 25, 2013, 16:28 PM IST

  • वागण्या-बोलण्यातच तारतम्य नसेल तर दर्जेदारपणा कसा टिकेल?- जावेद अख्तर

जयपूर- जयपूरमधील साहित्योत्सवात दुस-या दिवशी प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर प्रकाशझोतात आले. डिग्गी पॅलेसमधील लॉनमध्ये झालेल्या 'बॉलिवूड एंड नॅशनल नॅरेटिव' सत्रात जावेद अख्तर बोलले. ते जेव्हा हिंदी चित्रपटांच्या घसरलेल्या दर्जाविषयी बोलायले लागले तेव्हा चित्रपटांतील भाषा, वागण्या-बोलण्याचे तारतम्य आणि एकूनच शिष्टाचार घसरल्याचे त्यांनी मान्य केले.

जावेद अख्तर यांनी हिंदी चित्रपटांच्या इतिहासाकडे डोळेझाक करीत त्यात त्रुटी असल्या तरी भारतीय चित्रपटसृष्ठीला उज्ज्वल भविष्य असल्याचे सांगतात. अख्तर यांनी मुख्य प्रवाहाच्या चित्रपटात घट व घसरण होण्याला चित्रपटाचे निर्माते, गीतकार, संगीतकार व लेखकांना जबाबदार धरले. समाज आणि चित्रपट एकमेंकाशी निगडीत असतात. त्यामुळे चित्रपटही तसेच येणार आणि त्यातील गाणीही तशीच असणार असे नाराजीच्या सूरात सांगितले.

निर्माते आणि गीतकार हे काही दुस-या ग्रहावरून येणार नाहीत. त्यांच्यावरही समाजाचा प्रभाव असतो. त्यामुळे चित्रपटही त्याच पठडीतील बनतात. त्यामुळे चित्रपटाला अनुसरूनच गाणी लिहावी लागतात व लिहली जातात लोकांनाही आजकाल 'इंस्टंट' मजा, मनोरंजन अपेक्षित असते. नाही तर लोकांनीही आपली सायंकाळ 500 - 1000 रूपये घालवून खराब करुन घ्यायला चित्रपटगृहात गेली नसती, अशी पुष्ठीही त्यांनी जोडली.

अख्तर पुढे म्हणतात, पहिले चित्रपटात आपले म्हणणे, मत मांडण्याची एक आदबशीर भाषा होती. आता ती आदबही राहिली नाही आणि भाषाही राहिली नाही. याआधी गीतकार असे लिहीत जसे, "खयालों में किसी के इस तरह आया नहीं करते, किसी को ख्वाबों में भी तड़फाया नहीं करते.'' पण आता समाज बदलला. सिनेमाही बदलला, तंत्रज्ञान बदले. सर्व काही वेगाने बदलत आहे. यात कोणाला दोष द्यायचा. त्यामुळे आजकाल तू-तू, मैं-मैं, आजा-आजा यासारखी गाणी ऐकायला मिळणारच. पण मी निराशावादी नाही. हा काळही निघून जाईल. नवे दिग्दर्शक येत जे गंभीर व चांगल्या विषयाला हात घालत आहेत. चित्रपटाच्या सुधारणेची प्रक्रिया निरंतर व दीर्घ असते. त्यासाठी काही काळ जावाच लागेल.

हिंदी चित्रपटाचा दर्जा घसरण्यामागे भाषेचेही मुख्य कारण आहे. ज्याप्रमाणे देशातील सामाजिक- आर्थिक स्थिती बदलत चालली आहे त्याचप्रमाणे लोकांची पसंती बदलत आहे. शहरीकरण वाढत चालले आहे, स्थंलातर वाढले आहे त्यामुळे एक मिश्र संस्कृती तयार झाली आहे होऊ पाहत आहे. ही मिश्र संस्कृती स्थिर होण्यास काळी काळ जावाच लागेल, असेही अख्तर यांनी स्पष्ट केले.

Next Article

Recommended