आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jethmalani, Sinha Bat For \'secular\' Narendra Modi As PM

नरेंद्र मोदी 100 टक्के धर्मनिरपेक्ष: जेठमलानी; \'जेडीयू\'ही तयार होईल

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे भाजपचे पंतप्रधानपदाचे सर्वोत्तम उमेदवार आहेत. तसेच ते 100 टक्के धर्मनिरपेक्ष असून, त्यांच्या उमेदवारीबाबत संयुक्त जनता दलाची सहमती मिळवता येईल, असे मत भाजपचे खासदार राम जेठमलानी व यशवंत सिन्हा यांनी व्यक्त केले आहे.

मोदी हे 100 टक्के धर्मनिरपेक्ष असून, त्यांच्या विरोधकांनी त्यांच्याविरोधात अपप्रचार करुन त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर गैर आरोप लावण्यात आले. तसेच ते 100 टक्के धर्मनिरपेक्ष असल्याचे माझी खात्री आहे.

सोमवारीच यशवंत सिन्हा आणि जेठमलानी यांनी भाजपने मोदी यांचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नाव जाहीर करावे अशी मागणी केली होती. त्यानंतर दुस-या दिवशीही या जोडगळीने मोदींची वकिली केली. मोदी हे पंतप्रधानपदाचे सर्वोत्तम उमेदवार आहेत याबाबत माझे पक्के मत झाले आहे. कारण माझ्या मताला यशवंत सिन्हा यांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळेच ते धर्मनिरपेक्ष असल्याचे संयुक्त जनता दलाला पटवून देता येईल व तेही तयार होतील, असे मत जेठमलानी यांनी व्यक्त केले.