आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जोंक संस्कृतीला 10 हजार वर्षांचा इतिहास

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायपूर - पाषाणयुगाच्या अनुषंगाने देशाच्या इतिहासात काही नवे अध्याय समाविष्ट होण्याची चिन्हे दिसत आहेत. छत्तीसगडमधील जोंक नदीच्या खो-या तील प्राचीन संस्कृतीचा अभ्यास करणा-या संशोधकांना काही दगडी हत्यारे सापडली आहेत. आदिमानवाने तयार केलेली ही दगडी हत्यारे सुमारे 8 ते 10 हजार वर्षे जुनी असल्याचा दावा संशोधक करत असून, त्यापैकी काही हत्यारे 12 हजार वर्षे किंवा त्याही पूर्वीची असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पाषाणयुग पूर्वकाळातील मानव या अवजारांचा वापर प्राण्यांची शिकार करणे तसेच कातडे सोलण्यासाठी करत असावा असा पुरातत्व तज्ज्ञांचा अंदाज आहे. पुरातत्व विभागाचे अधिकारी अतुल प्रधान यांनी दिलेल्या माहितीनुसार संशोधनाच्या या पहिल्या टप्प्यात लिलेसर, रेवा, उदरलमी या गावांमध्ये पुरातन भांड्यांच्या तुकड्यांसह लोखंड वितळवून त्यापासून काही वस्तू तयार करण्याचे काही पुरावे सापडले आहेत. 8000 वर्षांपासून ते गेल्या 800 वर्षांपर्यंत मानवी संस्कृतीचा होत गेलेला विकास यातून ठळकपणे जाणवतो.

हजारो वर्षांनंतरही दगडी अवजारांची धार शाबूत
नदीच्या खो-या त एकूण 5 ठिकाणी ही अवजारे सापडली. या भागात आढळणा-या क्वार्ट्झ तसेच इतर दगडांपासून तयार केलेल्या या अवजारांचा वापर आदिमानव विविध कामांसाठी करत असावा. हजारो वर्षे मातीखाली गाडलेली असूनही या अवजारांची धार आजही शाबूत असल्याचे दिसते.
डॉ. शिवानंद वाजपेयी, पुरातत्व अधिकारी, रायपूर