आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Judge Mukesh Mudgal Favors Making Betting In Cricket Legal

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'घोड्यांवर सट्टा चालतो, मग सचिनवर का नाही?'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- घोड्यांवर अधिकृतपणे सट्टा लावला जाऊ शकतो तर मग सचिन तेंडुलकरवर तो का लावता येत नाही? हे कसले विडंबन आहे? असा प्रश्न निवृत्त न्यायाधीश मुकेश मुद्गल यांनी उपस्थित केला आहे. सट्टेबाजीला अधिकृत मान्यता दिल्यास मॅच फिक्सिंग, स्पॉट फिक्सिंगसारखे प्रकार संपुष्टात येतील व मोठ्या प्रमाणात महसूल मिळू शकेल, असा दावाही त्यांनी केला आहे.
वाणिज्य व उद्योग संघटना फिक्कीद्वारे आयोजित ‘खेळांमधील सट्टेबाजी’वर आधारित एका संमेलनात बोलताना मुद्गल यांनी वरील मागणी केली आहे. मुद्गल हे पंजाब - हरियाणा उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश असून ते आंतरराष्‍ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) यासंदर्भात नेमलेल्या स्वतंत्र समितीचे सल्लागार आहेत.
त्यांनी सांगितले की, भारतात घोडेस्वारीवर सट्टा लावणे वैध आहे. तर दुसरीकडे अन्य खेळांवर सट्टा लावणे कायदेशीरदृष्ट्या गुन्हा आहे.
या पार्श्वभूमीवर मुद्गल यांनी फिक्किीतर्फे आयोजित चर्चेत वरील मत व्यक्त केले. सट्टेबाजीला कायदेशीर मान्यता दिली गेली तर मॅच फिक्सिंगच्या प्रकारापासून क्रिकेटची सुटका होऊ शकते. प्राप्त माहितीनुसार सध्या देशभरात दरवर्षी क्रिकेटवर जवळपास 3 लाख कोटींचा सट्टा लावला जातो. आयपीएल किंवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत हा आकडा आणखी वाढतो. यात अंडरवर्ल्ड, हवाला, काळा पैसा व यासारख्या अनेक अवैध प्रकारांचा सहभाग वाढत जातो. क्रिकेटच्या वर्तुळात घुसलेल्या अपप्रवृत्ती रोखल्या गेल्या पाहिजेत. सट्टेबाजीला कायदेशीर मान्यता हा त्यासाठी पर्याय ठरू शकतो.

मोठ्या प्रमाणात महसूल
न्यायमूर्ती मुद्गल यांच्या म्हणण्यानुसार सट्टेबाजीला आळा घालण्यासाठी आपण तयार केलेले कायदे जुने झाले असून ते पूर्णत: कुचकामी ठरले आहे. इंटरनेट व तंत्रज्ञानामुळे सट्टेबाजांना पकडणे कठीण झाले आहे. त्यामुळे आपल्याला खेळातल्या सट्टेबाजीलाच कायदेशीर रुप देऊन त्याला अधिकृत चौकटीत आणावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

क्रिकेट आणि फिक्सिंग
क्रिकेट आणि मॅच फिक्सिंगचा वाद तसा जुनाच आहे. विश्वचषक स्पर्धेतील काही सामने फिक्स झाल्याचा आरोप मध्यंतरी झाला होता. मॅच फिक्सिंगनंतर स्पॉट फिक्सिंग पुढे आले असून आयपीएल स्पर्धेत स्पॉट फिक्सिंगप्रकरणी काही खेळाडूंना निलंबित करण्यात आले होते.
या कारणांमुळे सचिनचा खासदारपदाचा निर्णय चुकलाच ?
स्‍पॉट फिक्सिंग: एक नोबॉल टाकण्‍याची किंमत 10 लाख रूपये