आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्ली गॅगरेपप्रकरणी लवकरच न्यायनिवाडा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक



नवी दिल्ली/ न्यूयॉर्क - राजधानी दिल्लीत धावत्या बसमध्ये झालेल्या सामूहिक बलात्काराचे प्रकरण संयुक्त राष्‍ट्रात पोहोचले आहे. मृत पीडित तरुणीला लवकर न्याय मिळेल. या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर शिक्षा देऊन सरकार एक कठोर संदेश देईल, असे भारताने गुरुवारी संयुक्त राष्‍ट्राच्या महिला विभागाला सांगितले. संयुक्त राष्‍ट्राच्या महिला कार्यकारी मंडळाच्या आवाहनानंतर भारताचे युनोतील कायम प्रतिनिधी हरदीप पुरी यांनी वरील निवेदन केले. मंडळाच्या नियमित बैठकीआधी जगभरातील सरकारांना महिलाविरोधातील हिंसाचार समाप्त करण्याचे आवाहन केले होते.


कुमार न्यायालयात चालणार अल्पवयीन मुलाचा खटला
दिल्लीतील सामूहिक बलात्कार प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा खटला कुमार न्यायालयात चालणार आहे. गुरुवारी हा निकाल देण्यात आला. गीतांजली गोयल यांच्या अध्यक्षतेखालील या न्यायालयाने सुब्रह्मण्यम स्वामी यांचा अर्ज रद्द केला. विशेष म्हणजे वर्मा यांच्या समितीने 18 वर्षांची वयोमर्यादा कायम ठेवण्याची शिफारस केली आहे.

पीडित तरुणीला पॅरामेडिकल परीक्षेत 73 टक्के
डेहराडून%दिल्लीतील सामूहिक बलात्कारातील पीडित तरुणीला पॅरामेडिकल अभ्यासक्रमाच्या अखेरच्या सेमिस्टरमध्ये 73 टक्के प्राप्त केले आहेत.
* वर्गात सर्वात हुशार - डेहराडून येथील साई इन्सिट्यूटचे प्रमुख हरीश अरोरा यांनी पीडित प्रतिभासंपन्न होती, असे भावुक स्वरात सांगितले. तिने प्रत्येक विषयात चांगले गुण प्राप्त केले असून वर्ग मित्र मैत्रिणींपेक्षा तिने अधिक गुण मिळवले आहेत.
*संस्थेने शुल्क परत केले - पीडिताच्या मित्र-मैत्रिणींना तिचा निकाल समजल्यावर त्यांचेही डोळे पाणावले. आमच्या संस्थेने पीडित विद्यार्थिनीचे शुल्क परत केले आहे. याच संस्थेच्या विद्यार्थी, शिक्षक व कर्मचा-यांनी धरणे आंदोलन केले होते. दिल्लीतील निदर्शनादरम्यान त्यांना पोलिसांच्या लाठ्याही खाव्या लागल्या होत्या.

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्येही चर्चा
दावोस - येथे सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या सुरुवातीस दिल्लीतील सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणीला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. आंतरराष्‍ट्रीय नाणे निधीचे प्रमुख ख्रिस्टिन लॅगार्ड यांनी पाकिस्तामध्ये मुलींच्या शिक्षणासाठी जनजागृती करणा-या मलाला युसूफजईच्या कार्याचेही कौतुक केले.