आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Justice Verma Committee Submits Recommendations To Cabinet

बलात्‍कारप्रकरणी कठोर शिक्षा हवीः न्‍या. वर्मा समितीचा सरकारला अहवाल सादर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- नवी दिल्लीत 16 डिसेंबर रोजी तरुणीवर झालेल्या सामुहिक बलात्‍काराच्‍या घटनेनंतर देशातील तरुणाई पेटून उठली. हा असंतोष योग्‍य होत असे सांगतानाच न्‍या. जे. एस. वर्मा यांनी बलात्‍कराच्‍या गुन्‍हेगारांना कठोर शिक्षेची शिफारस केली आहे. महिलांवर होणा-या अत्याचारांना आळा घालण्यासाठी असलेल्या कायद्यांत सुधारणा करण्यासाठी न्या. जे. एस. वर्मा यांच्या अध्‍यक्षतेखाली समिती नेमण्‍यात आली होती. या समितीने केंद्र सरकारला आज अहवाल सोपविला. त्‍यानंतर त्‍यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

न्‍या. वर्मा म्‍हणाले, देशातील तरुणाईमुळेच सरकारला बलात्‍कारासारख्‍या गुन्‍ह्यांसाठी असलेल्‍या कायद्यांमध्‍ये बदल करणे भाग पडले. आम्‍ही कायद्यांमध्‍ये सुधारणा करण्‍यासाठी विविध घटकांशी चर्चा केली. सुमारे 80 हजार सूचना प्राप्‍त झाल्‍या. प्रत्‍येक सूचना आम्‍ही काळजीपूर्वक वाचून 29 दिवसांमध्‍ये अहवाल सादर केला. त्‍यामुळे सरकार त्‍यावरुन लवकरात लवकर कायद्यात सुधारणा करु शकते.

न्‍या. वर्मा यांनी केंद्रीय गृहसचिवांवर टीका केली. बलात्‍काराची घटना घडल्‍यानंतर गृह सचिवांनी पोलिस आयुक्तांचे कौतूक केले. याचा मला धक्‍काच असला. गुन्‍हेगारांना पकडण्‍याशिवाय गुन्‍हा घडण्‍यापासून रोखण्‍याचेही काम पोलिसांचे आहे. त्‍यादृष्‍टीने पोलिसांमध्‍ये संवेदानशीलता निर्माण झाली पाहिजे.

न्‍या. वर्मा यांनी लष्‍करी आणि निमलष्‍करी दलाच्‍या कर्मचा-यांकडून होणा-या लैंगिक अत्‍याचारालाही भारतीय दंड विधानाच्‍या अंतर्गत आणण्‍याची शिफारस केली आहे. काही विशिष्‍ट राज्‍यात विशेष कायदे लागू आहेत. त्‍यापैकी काही ठिकाणी लागू असलेल्‍या विशेष कायद्याचा आढावा घेण्‍याची गरजही असल्‍याचे न्‍या. वर्मा यांनी शिफारसींमधून सांगितले.