आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कलमाडींचे नाव क्वीन्स बॅटन घोटाळय़ात नाही

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - राष्ट्रकुल घोटाळय़ात सीबीआयने क्वीन्स बॅटनप्रकरणाशी संबंधित आणखी एक आरोपपत्र दाखल केले. त्यात संयोजन समितीचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांचे नाव नाही. सीबीआयचे विशेष न्यायाधीश तलवंत सिंह यावर 27 ऑगस्ट रोजी सुनावणी करतील. क्वीन्स बॅटन रिलेच्या आयोजनातील गैरव्यवहार प्रकरणात कलमाडी यांच्याविरुद्ध कोणताही पुरावा नसल्याचे सीबीआयने म्हटले आहे. त्यांना आरोपीदेखील करण्यात आलेले नाही. तपास यंत्रणेने आयोजन समितीतील अधिकारी टी.एस. दरबारी, संजय महिंद्रू, जयचंद्रन आणि लंडन येथील व्यापारी आशिष पटेल यांची नावे त्यात आहेत.