Home »National »Other State» Kalyan Singh Comment On Modi & Rahul Gandhi

नरेंद्र मोदी 'शेर' तर राहुल गांधी 'बछडा'- कल्याणसिंग

दिव्य मराठी वेब टीम | Feb 11, 2013, 14:07 PM IST

  • नरेंद्र मोदी 'शेर' तर राहुल गांधी 'बछडा'- कल्याणसिंग

बुलंदशहर- गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे 'शेर' आहेत तर, काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे मोदींपुढे 'बछडा' आहेत, असे वक्तव्य कल्याणसिंग यांनी करीत पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फोडले आहे.

उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री राहिलेले व एकेकाळी भाजपमधील दांडगे प्रस्थ असलेले कल्याणसिंग यांचा मागील दहा वर्षात राजकीय आलेख झटकन घसरला होता. भाजपमधील अंतर्गत वादाचा बळी ठरल्यानंतर वरिष्ठ नेतृत्त्वावर आरोप-प्रत्यारोप करताच कल्याणसिंगांच्या जागेवर भाजपने राजनाथसिंग यांना मुख्यमंत्री केले होते. त्यानंतर भाजपला राम-राम केल्यानंतर काही दिवस एकांतवासात, पुढे समाजवादी पक्षात व तेथूनही हाकलून दिल्यानंतर स्वत:चा पक्ष काढला होता. मात्र मागील महिन्यात आपला पक्ष भाजपमध्ये विलिन करुन पुन्हा एकदा स्वगृही परतलेल्या कल्याणसिंगांना राजकीय दृष्ट्या प्रसिद्धीझोतात यायचे आहे. त्यामुळे सध्याचा 'हॉट' विषय बनलेले नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्याबाबत वक्तव्य केले आहे.

कल्याणसिंग म्हणाले, मोदी यांचे नेतृत्त्व सक्षम आहे. ते देशातील लोकप्रिय नेते बनले आहेत. गुजरातमधील सर्वंकष विकास हे मोदींच्या सक्षमतेचे उदाहरण आहे. राहुल गांधी खूपच अपरिपक्व नेतृत्त्व असून, मोदींशी त्यांची तुलना करायची झाल्यास मोदी 'शेर' ठरतील, तर राहुल गांधी 'बछडा' ठरतील.


आम्ही हिंदुत्त्ववाद सोडला नसून, राम मंदिर बांधण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असेही कल्याणसिंग यांनी एका प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले. नरेंद्र मोदी हिंदुत्त्वाबाबत बोलत नसले तरी त्यांनी तो मुद्दा सोडला नसून ते कट्टर हिंदुत्त्ववादी असल्याचे कल्याणसिंगांनी स्पष्ट केले.

Next Article

Recommended