आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कल्‍याण सिंह पुन्‍हा भाजपच्‍या वाटेवर, गडकरींच्‍या नावाला अडवाणींची मंजूरी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- कॉंग्रेसने राहुल गांधींना उपाध्‍यक्ष बनविल्‍यानंतर विरोधी पक्ष भारतीय जनता पार्टीने पक्षांतर्गत कलह मिटविण्‍याच्‍या दिशेने पावले उचलली आहेत. दोन महत्त्वाच्‍या घडामोडींनी याकडे लक्ष वेधले आहे. नाराज झाल्‍यामुळे पक्षाबाहेर पडून स्‍वतंत्र पार्टी स्‍थापन करणारे कल्‍याण सिंह स्‍वगृही परतणार आहेत. त्‍यांच्‍या पक्षाचे भाजपमध्‍ये विलीन होणार आहे. तर दुसरीकडे नितीन गडकरी यांच्‍या अध्‍यक्षपदाच्‍या दुस-या टर्मवरही शिक्‍कामोर्तब झाल्‍याचे वृत्त आहे. ज्‍येष्‍ठ नेते लालकृष्‍ण अडवाणी यांचा विरोध निवळण्‍यात पक्षाला यश आले असून त्‍यांनी गडकरींच्‍या नावाला मंजूरी दिल्‍याचे वृत्त आहे.

भाजपच्‍या अध्‍यक्षपदासाठी 23 जानेवारीला निवडणूक होणार आहे. त्‍यासाठी काल अधिसूचना जारी करण्‍यात आली. अडवाणी यांनी गडकरींच्‍या नावाला विरोध केला होता. त्‍यांच्‍याऐवजी सुषमा स्‍वराज यांचे नाव अडवाणींनी सुचविले होते. परंतु, राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाने गडकरींचे नाव लावून धरले. त्‍यासाठी अडवाणींचीही मनधरणी करण्‍यात आली. अखेर त्‍यांचा विरोध मावळला आहे. दुसरी बाब म्‍हणजे, अध्‍यक्षपदासाठी दुस-या नावावर पक्षात मतैक्‍य होत नसल्‍याचे दिसून आले. हेदेखील अडवाणींचा विरोध मावळण्‍यामागील एक कारण असू शकते, असे जाणकारांचे मत आहे.

दुसरीकडे उत्तर प्रदेशचे माजी मुख्‍यमंत्री कल्‍याण सिंह भाजपमध्‍ये परतणार आहेत. ते सध्‍या अधिकृतरित्‍या पक्षात पुनरागमन करणार नाहीत. त्‍यांचा मुलगा आणि पत्‍नी भाजपमध्‍ये प्रवेश करतील. यासोबतच त्‍यांचा पक्ष जनक्रांती पार्टीचेदेखील भाजपमध्‍ये विलिनीकरण होईल. यावेळी नितीन गडकरींसह राजनाथ सिंह, मुरली मनोहर जोशी तसेच इतर नेते प्रामुख्‍याने उपस्थित राहणार आहे.