आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कल्याणसिंग भाजपमध्ये परतताच झाले भावूक! उमा भारतींचा काँग्रेसवर हल्लाबोल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनौ- गोमती नदीच्या किना-यावरील झुलेलाल ग्राऊंडमध्ये भाजपची अटल शंखनादची भव्य रॅली काढण्यात आली. भाजपचे राष्ट्रीय नेते मुख्तार अब्बास नक्वी, डॉ. मुरली मनोहर जोशी, राजनाथ सिंग, उमा भारती, विनय कटियार आणि यूपीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत वाजपेयी व्यासपीठावर उपस्थित होते. व्यासपीठाच्या मध्यभागी भाजपात दुस-यांदा परतणारे राष्ट्रीय जनक्रांती पार्टीचे नेते आणि माजी मुख्यमंत्री कल्याण सिंग, भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंग बसले होते.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितिन गडकरी हे हजर झाले. मात्र, गडकरींना विमानतळावर नागरिकांच्या रोषाला बळी पडावे लागले. राज्य कर्मचा-यांनी त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले. भाजपचे स्थानिक आमदार व नेते हुकूम सिंग यांनी कल्याणसिंगांवर स्तुतीसुमने उधळली. ते म्हणाले, कल्याणसिंग एक व्यक्ती नसून ती एक संस्था आहे. या संस्थेच्या मार्ददर्शनाखाली यूपीतील सरकारला आम्ही सळो की पळो करुन सोडू. आज दुपारी कल्याण सिंगांच्या पक्षाचे औपचारिकरित्या भाजपमध्ये विलिनीकरण करण्यात आले. यावेळी कल्याणसिंगांना अश्रू आवरता आले नाहीत. कल्याण सिंगांनी सर्वप्रथम 1999 मध्ये भाजप पक्ष सोडला होता. त्यानंतर ते पुन्हा 2004 मध्ये पक्षात परतले होते. 2009 साली पुन्हा एकदा भाजप सोडून ते समाजवादी पक्षात गेले होते. मात्र, समाजवादी पक्षातील मुस्लिम नेत्यांनी मोठा विरोध केल्यानंतर मुलायम सिंगांनी त्यांना पक्षातून बाहेर काढले होते. तेव्हापासून ते आपल्या राष्ट्रीय जनक्रांती पार्टीचे काम पाहत होते. अखेर त्यांनी सर्व स्टेशने घेतल्यानंतर दुस-यांदा भाजपमध्येच परतणे पसंत केले आहे.

पुढे वाचा, कल्याणसिंग आणि उमा भारती काय म्हणाले...