आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाजपवर ‘कमल’ प्रहार!, मुखपत्राने भाजप नेत्यांना घेतले फैलावर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - ‘वर्गातील विद्यार्थी बिघडला तर समजून घेता येऊ शकते. परंतु येथे तर शिक्षक आणि मुख्याध्यापकच घसरण्याची तयारी करू लागले आहेत... फक्त माझेच चालणार. माझे नाही तर कुणाचेही चालणार नाही. अशा पद्धतीने ना संघटना चालते, ना समाज ना कुटुंब’ भाजपचे मुखपत्र ‘कमल संदेश’च्या अग्रलेखात ही टिप्पणी करण्यात आली आहे. मुखपत्राचा ताजा अंक शुक्रवारी प्रसिद्ध झाला. त्याच्या अग्रलेखात कोणाचेही नाव न घेता भाजपमध्ये नुकत्याच घडलेल्या घटनाक्रमावर सडकून टीका करण्यात आली आहे. मात्र गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हेच ‘कमल संदेश’च्या टीकेचे लक्ष्य असल्याचे मानले जाऊ लागले आहे. मध्य प्रदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्यसभेचे सदस्य प्रभात झा हे या मुखपत्राचे संपादक आहेत.

काही दिवसांपूर्वी कर्नाटक, गुजरात आणि राजस्थान भाजपमध्ये जे काही घडले त्यामुळे भाजप कार्यकर्ते आणि सर्मथकांना प्रचंड यातना झाल्या आहेत. पक्ष कोणा एकाच्या नव्हे तर सर्वांच्या सहकार्यातून चालत असतो. जेव्हा आम्ही एखाद्याची गरजेपेक्षा जास्ती स्तुती करतो, तेव्हा त्यांच्या बिघडण्याचा मार्ग आपण स्वत:होऊनच मोकळा करून देतो.

टीकेची पार्श्वभूमी

> गुजरातमध्ये केशुभाई पटेल आणि सुरेश मेहता यांनी मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीवर जोरदार आक्षेप घेतले होते.

> कर्नाटकामध्ये बी.एस. येदियुरप्पा बंडखोरीच्या पवित्र्यात आहेत.

> राजस्थानमध्ये वसुंधराराजे यांनी गुलाबचंद कटारिया यांच्या यात्रेवर आक्षेप घेतला होता. राजीनाम्याचे राजकारण करून दबाव वाढवला होता.

ताजा वादविवाद

> मुंबईत भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीआधी संजय जोशी यांचा राजीनामा. नरेंद्र मोदी यांचा दबाव हे त्यामागचे कारण सांगितले जाते.

> मुंबईत पक्षाच्या जाहीर सभेत लालकृष्ण अडवाणी आणि सुषमा स्वराज सहभागी झाले नाहीत. पक्षाध्यक्ष नितीन गडकरी यांच्यावरील नाराजी हे त्यामागचे कारण सांगितले गेले.

> अडवाणी यांनी त्यांच्या ब्लॉगवर नितीन गडकरी यांना फैलावर घेतले. नाव न घेता त्यांच्या निर्णयावर टीकास्त्र सोडले होते.

सर्वांपेक्षा संघटना मोठी-झा

सर्वांपेक्षा संघटना मोठी आहे. अग्रलेखातूनही हाच संदेश देण्यात आला आहे, असे प्रभात झा यांनी भोपाळमध्ये सांगितले. कोणत्याही घटनेला मोठय़ा बातमीचे स्वरूप देणे योग्य नसल्याचे भाजपचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी नवी दिल्लीत सांगितले.
साक्षात्कारी अडवाणी (अग्रलेख)
अडवाणी, सुषमांनी सभेकडे फिरवली पाठ
पक्षवाढीसाठी आणखी मेहनत घेण्याचे आवाहन - अडवाणी