आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Kannauj Lok Sabha By Election In Cm Akhilesh Yadavs Wife Dimpal Yadav

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: सपाकडून डिंपल यादव रिंगणात, भाजप-बसपा तळ्यात-मळ्यात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ: उत्तर प्रदेशातील कन्नौज लोकसभा मतदार संघात होत असलेल्या पोटनिवडणुकीत सत्तारुढ समाजवादी पक्षाकडून मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव यांना उमेदवारी ‍दिली आहे. त्या आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. दरम्यान ही पोटनिवडणूक कॉंग्रेस लढविणार नसल्याचे कॉंग्रेस महासचिव व उत्तर प्रदेशचे प्रभारी दिग्विजय सिंग यांनी जाहीर केले आहे. तर ही ‍पोटनिवडणूक लढवायची की नाही, याबाबत भाजप आणि बसपा द्विधा मनस्थितीत आहे.
कन्नौज येथील पोटनिवडणुकीत कॉंग्रेस आपला कोणताही उमेदवार उभा करणार नसल्यामुळे सपाच्या उमेदवार डिंपल यादव यांना फायदा होणार असल्याची चर्चा आहे. 2009 मध्ये ही कॉंग्रेसने या जागेसाठी लोकसभा निवडणूक लढविली नव्हती. त्यामुळे या वेळीदेखील कॉंग्रेस निवडणूक रिंगणात उतरणार नसल्याचे दिग्विजय सिंग यांनी सांगितले.
मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अखिलेश यादव यांनी कन्नौज लोकसभा सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी 24 जून रोजी पोटनिवडणूक होत आहे.
कन्नौजमध्ये काढण्यात आलेल्या एका रॅलीत आपली पत्नी डिंपल यादव हिला निवडून देण्‍याचे आवाहन मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी केले आहे. फिरोजाबाद येथे झालेल्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे उमेदवार राज बब्बर यांनी डिंपल यादव यांचा पराभव केला होता.
डिंपल यादव कन्‍नौजमधुन लोकसभा पोटनिवडणूक लढविणार
लोकायुक्ताच्या कक्षेत मुख्यमंत्री नको - अखिलेश यादव
उत्तर प्रदेशचे मुख्‍यमंत्री अखिलेश यादव यांचे कुटुंबिय आहे कर्जबाजारी