आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Kannauj lok sabha by election in cm akhilesh yadavs wife dimpal yadav

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कनौज लोकसभा पोटनिवडणूक : काँग्रेसपाठोपाठ बसपाचीही माघार, डिंपलचा मार्ग मोकळा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ: उत्तर प्रदेशातील कन्नौज लोकसभा मतदार संघात होत असलेल्या पोटनिवडणुकीत सत्तारुढ समाजवादी पक्षाकडून मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव यांनी अर्ज भरल्याने काँग्रेसनंतर आता बहुजन समाज पार्टी या पक्षानेही माघार घेतली आहे. डिंपल यांनी आपला उमेदवारी अर्ज मंगळवारी केला होता. त्यानंतर ही पोटनिवडणूक कॉंग्रेस लढविणार नसल्याचे उत्तर प्रदेशचे प्रभारी दिग्विजय सिंग यांनी जाहीर केले होते. आता बसपाने माघार घेतली आहे. दरम्यान, भाजपने आपण ही जागा लढविणार असल्याचे म्हटले आहे. तसेच भाजपचे उमेदवार म्हणून जयदेव सिंग यांचे नाव नक्की केले आहे.
कन्नौज येथील पोटनिवडणुकीत कॉंग्रेसपाठोपाठ आता बसपा आपले उमेदवार देणार नसल्यामुळे डिंपल यादव यांना फायदा होणार आहे. 2009 मध्येही कॉंग्रेसने येथील लोकसभा निवडणूक लढविली नव्हती.
मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अखिलेश यादव यांनी कन्नौज लोकसभा सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी 24 जून रोजी पोटनिवडणूक होत आहे. कन्नौजमध्ये काढण्यात आलेल्या एका रॅलीत आपली पत्नी डिंपल यादव हिला निवडून देण्‍याचे आवाहन मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी केले आहे. २००९ साली डिंपल यादव यांचा फिरोजाबाद लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार राज बब्बर यांनी पराभव केला होता.
PHOTOS: कनौज लोकसभा पोटनिवडणुकीत सपाकडून डिंपल यादव रिंगणात