आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Karnataka: Sadananda Gowda Sets Conditions Before Resigning Cm Position

'प्रदेश अध्यक्षपद दिले नाही तर, राजीनामा देणार नाही' - सदानंद गौडा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बेंगळुरु - कर्नाटकात भारतीय जनता पक्षासमोरील संकटे कमी होण्याऐवजी वाढत आहेत. काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री पदावरून पायऊतार करण्यात आलेले सदानंद गौडा यांनी राजीनामा देण्यापूर्वी भाजप हायकमांडसमोर एक अट ठेवली आहे. गौडा यांचे म्हणणे आहे की, जर त्यांना भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद दिले तरच ते मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतील. जगदीश शेट्टर यांची भाजपने विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी घोषणा केली आहे. १२ जुलैला जगदीश शेट्टर मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.
भाजपचे नेते अरुण जेटली आणि राजनाथ सिंह यांनी माजी मुख्यमंत्री येडियुरप्‍पा यांची भेट घेतली आहे. सदानंद गौडा हे सुद्धा जेटली आणि राजनाथ सिंह यांना भेटले आहेत. सदानंद गौडा यांनी राजीनामा द्यावा यासाठी भाजपने दोन उपमुख्यमंत्री नियुक्त करण्याचा नवीन फॉर्म्युला काढला आहे. सदानंद गौडा आता लवकरच राज्यपाल भारद्वाज यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्त करू शकतात असे सांगण्यात येत आहे.
कर्नाटक : सदानंद गौडा पायऊतार? शेट्टर नवे मुख्यमंत्री होणार