आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्नाटकात भाजप सरकारला सुरुंग

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगलुरू - दिल्लीत राजनाथसिंह भाजपाध्यक्षपदाची शपथ घेत असताना कर्नाटकात भाजप सरकारला सुरुंग लागला. माजी मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा यांच्या दोन समर्थक मंत्र्यांनी बुधवारी राजीनामे दिले, तर 11 आमदार भाजपला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत.शेट्टार सरकारला अर्थसंकल्प मांडू देणार नाही, अशी भीष्मप्रतिज्ञा येदियुरप्पा यांनी केली होती. येड्डींच्या ‘तिक्काटा’मुळे (राजकीय कट कारस्थान) विधिमंडळ अधिवेशनापूर्वीच सरकार संकटात सापडले आहे.

मुख्यमंत्री जगदीश शेट्टार यांच्या सहा महिन्यांच्या सरकारला कोंडीत पकडण्याची एकही संधी येदियुरप्पा यांनी सोडली नव्हती. बुधवारी सार्वजनिक येड्डी समर्थक बांधकाममंत्री सी. एम.उदासी आणि ऊर्जामंत्री शोभा करांडलाजे या दोघांनी सकाळी मुख्यमंत्री शेट्टार यांच्याकडे राजीनामे दिले. त्यानंतर 11 आमदार विधानसभा अध्यक्षांकडे
सामूहिक राजीनामे देण्यासाठी त्यांच्या कार्यालयात गेले होते. मात्र, अध्यक्ष के.जी. बोपिय्या कार्यालयात नव्हते. विधिमंडळ सचिव ओमप्रकाश हेही गैरहजर होते. हे कळताच येदियुरप्पांनी तडक विधिमंडळ सचिवालय गाठले. शेट्टार सरकार अल्पमतात गेल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा देण्याची मागणी त्यांनी केली.