आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उत्तर प्रदेश सरकारच्या 'या' निर्णयाचा लखनऊ ते अजमेर पर्यंत विरोध

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - उत्तर प्रदेश सरकारने लखनऊ येथील काशीरामजी उर्दू अरबी-फार्शी विद्यापीठाचे नाव बदलून ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती उर्दू, अरबी-फार्शी विद्यापीठ असे केले आहे. याचा बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती यांच्यासह अजमेर दर्ग्याचे सज्जादनशीन सय्यद जैनूल आबेदीन अली खान यांनी विरोध केला आहे.
अजमेरमधील हजरत ख्वाजा मोईनुद्दीन हसन चिश्ती दर्ग्याचे सज्जादनशीन यांनी 'दैनिक भास्कर'ला पाठवलेल्या ई-मेल मध्ये म्हटले आहे की, कोणत्याही सुफी संताच्या नावाचा वापर राजकारणासाठी करण्यात येऊ नेये. ते म्हणाले, उत्तर प्रदेश सरकारला ख्वाजा साहेबांविषयी जर एवढी आस्था आणि प्रेम असेल तर त्यांनी ख्वाजा मोईनुद्दीन चिश्तींच्या नावाने नवी शिक्षण संस्था सुरु करायला पाहिजे होती. काशीरामजींच्या नावाने सुरु असलेल्या विद्यापीठाचे नाव बदलून त्याला सुफी संताचे नाव दिल्या जात आहे, यात राजकारण दिसत असून, जनतेने त्यापासून दूर राहिले पाहिजे.
उत्तर प्रदेशात बहुजन समाज पार्टीची सत्ता असताना तत्कालिन मुख्यमंत्री मायावती यांनी या विद्यापीठाची मुहूर्तमेढ रोवली होती. राज्यात सत्ता परिवर्तन होऊन समाजवादी पक्ष सत्तेवर आल्यानंतर सत्ताधारी पक्षाचे नेते आणि नगर विकास मंत्री आजम खान यांनी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना पत्र पाठवून विद्यापीठाला उर्दू-फार्शी विद्वानाचे किंवा साहित्यिकाचे नाव द्यावे अशी सुचना केली. त्यानंतर विद्यापीठाच्या कुलगुरूंना नावे सुचविण्यास सांगण्यात आले. त्यांनी सुचविलेल्या दहा नावांपैकी सुफी संत हजरत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
मायावतींनी एक निवेदन प्रसिद्ध करुन राज्य सरकार राजकीय वैमनस्यातून काम करत असल्याचा आरोप केला आहे. त्या म्हणाल्या, सपा सरकारचा निर्णय काशिराम आणि बसपा चळवळीशी दगाबाजी करणारा आहे. कारण, १९९३ मध्ये समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंह यादव संपल्यात जमा होते तेव्हा काशीराम यांनी त्यांना आधार दिला आणि सप-बसपा आघाडीचे त्यांना मुख्यमंत्री केले होते.
मायावती पुतळा प्रकरण: बसपाचे धरणे आंदोलन; राज्यात संचारबंदी लागू
पार्कमध्‍ये इतर बांधकाम झाल्‍यास कायदा व्‍यवस्‍था बिघडेलः मायावती गरजल्‍या
मायावती राज्यसभेत?
कांशीराम यांचे स्वप्न खरे करा - मायावती