आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोदींवरील टीकेवरुन न्‍या. काटजू-अरुण जेटली आमने-सामने

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- प्रेस काऊंसिलचे अध्‍यक्ष न्‍या. मार्कंडेय काटजू आणि भारतीय जनता पार्टीच्‍या नेत्‍यांमध्‍ये चांगले शाब्दिक द्वंद्व रंगले आहे. न्‍या. काटजू यांनी भाजपचे नेते आणि गुजरातचे मुख्‍यमंत्री नरेंद्र मोदी यांच्‍यावर कडाडून टीका केली. त्‍यानंतर भाजप नेत्‍यांची एक मोठी फळीच मोदींच्‍या समर्थनार्थ मैदानात उतरली. भाजप नेते अरुण जेटली यांनी न्‍या. काटजुंचा राजीनामा घेण्‍याची मागणी केली आहे. तर जेटलींनी राजकारण सोडून द्यावे, अशी टीका न्‍या. काटजुंनी प्रत्‍युत्तरात केली आहे.

एका वर्तमानपत्रात न्‍या. काटजू यांनी लिहिलेल्‍या लेखामध्‍ये मोदींवर टीका केली. देशाच्‍या जनतेने विचारपूर्वक पंतप्रधान निवडण्‍याचे आवाहन त्‍यांनी या लेखातून केले. त्‍यांनी लिहिले की, गोधरामध्‍ये जे घडले, ते अजुनही एक रहस्‍यच आहे. जे काही घडले त्‍यात मोदींचा हात नव्‍हता, यावर विश्‍वास करु शकत नाही. देशातील एक मोठा भाग नरेंद्र मोदींना पंतप्रधान म्‍हणून पाहण्‍यास इच्‍छुक आहे. त्‍यांना मोदींकडून ब-याच अपेक्षा आहेत. भाजप आणि आरएसएसपाठोपाठ कुंभ मेळ्यातूनही मोदींसाठी नारे लागत आहेत. हा सर्व प्रपोगंडा मोदींनीच रचला आहे. गुजरातमध्‍ये मुस्लिम भीतीच्‍या सावटाखाली जगत आहेत. ते 2002 मधील दंगलींबाबत बोलल्‍यास त्‍यांना लक्ष्‍य करण्‍यात येईल, अशी भीती वाटते. देशाचे सर्व मुस्लिम मोदींच्‍या विरोधात आहेत. गोधरामध्‍ये एका ट्रेनमध्‍ये 59 हिंदुंची हत्‍या करण्‍यात आली. त्‍याचीच प्रतिक्रीया म्‍हणून त्‍यानंतर गुजरातमध्‍ये जे घडले ती याचीच प्रतिक्रीया असल्‍याचे मोदी समर्थक दावा करतात. गोधरातील दोषींना कडक शिक्षा द्यायला हवी होती. संपूर्ण मुस्लिम समुदायावर हल्‍ले करणे योग्‍य नाही. परंतु, त्‍यावेळी मुस्लिमांची सामुहिक हत्‍या झाली. त्‍यांचे घर जाळण्‍यात आले तसेच भयंकर अत्‍याचार झाले. संपूर्ण अरब जगताचे अत्तरदेखील मोदींवरील डाग मिटवू शकत नाही.