आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Katju's Modipuran Burning ; Blame Game Over Modi Among Parties

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काटजूंचे मोदीपुराण पेटले ;मोदींवरील टीकेवरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मार्कंडेय काटजू यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध केलेल्या टिप्पणीवरून सोमवारी दिवसभर आरोप-प्रत्यारोपांचा प्रचंड धुराळा उडाला. काटजू यांच्या बचावासाठी काँग्रेस पुढे आली तर काटजू हे ‘काँग्रेसजनांपेक्षाही जास्त काँग्रेसी’ असल्याची टीका राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरुण जेटली यांनी केली होती. त्यावर काँग्रेसने तीव्र आक्षेप घेतला आहे.

काटजू यांनी लिहिलेल्या लेखात मोदींवर केलेल्या टीकेमुळे राजधानी दिल्लीतील वातावरण तापले आहे. काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंह यांनी जेटली यांनाच लक्ष्य केले. काटजू हे नेहमीच नि:पक्षपाती राहिले आहेत, असे सांगतानाच मोदी यांनी राज्यसभेची उमेदवारी मिळवून दिली म्हणून जेटली अशा प्रकारची प्रतिक्रिया देत आहेत काय? जेव्हा काटजू महाराष्ट्र आणि हिमाचल प्रदेशातील काँग्रेस सरकारविरुद्ध बोलले तेव्हा जेटली गप्प का बसले? असे सवाल विचारले आहेत.

मोदींवर टीका करणारे सर्वच काँग्रेसी आहेत का, असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनू सिंघवी यांनी केला आहे. जेटली कोणताही विचार न करता आरोप करत आहेत. त्यांनी राजकारणातून संन्यास घ्यायला हवा, असे काटजू यांनीही म्हटले आहे.

लेख उत्कृष्टच : नरिमन
कायदेतज्ज्ञ फली एस. नरिमन यांनी मोदींविरुद्धच्या टीकेचे समर्थन करणारा पाठवलेला ई-मेलच काटजू यांनी प्रसिद्ध केला आहे. ‘लेख उत्तम आहे. ज्यांनी आयुष्यभर मानवी हक्कांच्या रक्षणासाठी लढा दिला अशा व्यक्तीने हा लेख लिहिला आहे,’ असे नरिमन यांनी या ई-मेल प्रतिक्रियेत म्हटले आहे.

काटजूंना हाकला: सिन्हा
अरुण जेटली यांच्यानंतर भाजप नेते यशवंत सिन्हा यांनीही काटजू यांचा मोदीविरोधातील लेख आचरटपणा असल्याचे म्हटले आहे. सर्वोच्च् न्यायालयाच्या माजी न्यायमूर्तींनी राजकारणात ढवळाढवळ करू नये. देशाचा पंतप्रधान कोण असावा, हे ते ठरवू शकत नाहीत. काटजू प्रेस कौन्सिलसारख्या संस्थेचे अध्यक्ष बनण्यास लायक नाहीत, असे माझे मत आहे. त्यामुळे त्यांना तत्काळ बडतर्फ केले पाहिजे, असे सिन्हा यांनी म्हटले आहे.

कॅग आणि भाजपचे साटेलोटे : अहमद
कॅगने काटजू अध्यक्ष असलेल्या प्रेस कौसिंल ऑफ इंडियाचे लेखापरीक्षण कॅग करते, असे वक्तव्य भाजपने केले आहे. त्यावर काँग्रेस नेते शकील अहमद यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. आपल्या विरोधकांचे खच्चीकरण करण्यासाठी ते कॅगचा वापर करत आहेत काय? भाजप आणि कॅगचे साटेलोटे आहे काय, असा सवाल अहमद यांनी केला आहे. याबाबत भाजपनेच स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. न्यायमूर्ती काटजू प्रत्येकावरच टीका करतात. तो त्यांचा अधिकार आहे. ते जो विचार करतात ते व्यक्त करण्याचे धारिष्ट्यही दाखवतात, असे परराष्ट्र व्यवहारमंत्री सलमान खुर्शिद यांनी म्हटले आहे. काटजू असामाजिक विचार व्यक्त करत आहेत. बिगरकाँग्रेसी सरकारे असलेल्या राज्यांविरुद्ध ते शेरेबाजी करत आहेत. माजी न्यायमूर्तीला हे शोभा देत नाही, असे भाजपचे प्रवक्ते राजीवप्रताप रूडी यांनी म्हटले आहे.