आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आकाशात बाण सोडून रोग पळवून लावतात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

केलांग (हिमाचल प्रदेश) - स्पिती खो-यामध्ये सध्या दाछंग उत्सवाची धूम सुरू आहे. प्रत्येक गावात हा उत्सव निरनिराळ्या पद्धतीने साजरा केला जातो. या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे या दिवशी गावातील 16 वर्षांपेक्षा मोठे आणि ज्यांचे आईवडील हयात आहेत, असे सर्व तरुण आकाशात बाण सोडतात. प्रत्येक बाण सोडण्यापूर्वी प्रदेशातील विशेष प्रकारचे पारंपरिक गीत गायले जाते. आकाशात असे बाण सोडल्याने सर्व रोग पळून जातात आणि कोणत्याही प्रकारच्या साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होत नाही, असे मानले जात असल्याचे माने गावातील प्रेमसिंह यांनी सांगितले. 14 ते 60 वर्षे वयोगटातील सर्व नागरिक रात्री नगा-याच्या तालावर पारंपरिक नृत्य करतात. तब्बल आठवडाभर हा उत्सव चालतो.