आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोदीविरोधक केशुभाई पटेल यांचा भाजपला अखेर रामराम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गांधीनगर/नवी दिल्ली - गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल आणि माजी केंद्रीय मंत्री कांशीराम राणा यांनी शनिवारी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. दोघांनी नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली. दरम्यान, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी दोघांनी निर्णयावर फेरविचार करावा, अशी विनंती केली.
केशुभार्इंनी सायंकाळी एक पत्रकार परिषद बोलावून भाजपला सोडचिठ्ठी देत असल्याची घोषणा केली. 90च्या दशकात केशुभार्इंच्याच नेतृत्वाखाली भाजपने गुजरातमध्ये सत्ता मिळवली होती. मात्र, नंतरच्या काळात नरेंद्र मोदी यांच्याशी मतभेद झाल्याने ते नाराज होते. 2001 मध्ये केशुभार्इंना हटवून नरेंद्र मोदी यांच्याकडे राज्याचे नेतृत्व सोपवण्यात आले होते. केशुभाई नवा राजकीय पक्ष स्थापन करणार असून याची सविस्तर माहिती रविवारी घोषित करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आपला पक्ष या वर्षाखेरीस होणा-या विधानसभा निवडणुकीत उतरणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
जड अंत:करणाने पक्ष सोडतोय... - पाच दशकांहून अधिक काळ भाजपमध्ये राहिल्यावर अत्यंत जड अंत:करणाने मी पक्ष सोडत आहे. मी आणि राणा, दोघांनीही कधी सत्ता आणि पदाची अपेक्षा ठेवली नाही. मोदी यांच्या नेतृत्वाखाली राज्यात भाजप मूळ तत्त्वांपासूनच भरकटला आहे, असे केशुभार्इंनी म्हटले आहे.
केशुभाई पटेल स्थापणार नवा पक्ष
दर्डांची कोलांटउडी, 'नरेंद्र मोदी राष्ट्रीय संत नाही, राष्ट्रीय कलंक'

गुजरात दंगलीप्रकरणी दोषी आढळल्यास भरचौकात फाशी द्या : नरेंद्र मोदी
'नरेंद्र मोदी हे सडलेले फळ, या गेंडयाला बाहेर फेका'