आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Keshubhai Patel May Be Cm Candidate Against Modi In Gujarat Election

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

केशुभाई पटेलांनी स्थापन केला गुजरात परिवर्तन पक्ष

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद - गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याविरोधात दंड थोपटून बाहेर पडलेले त्यांचे जुने सहकारी केशुभाई पटेल यांनी नव्या पक्षाची घोषणा केली आहे.
दोन दिवसांपूर्वीच त्यांनी भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकला. त्यानंतर केशुभाई काय निर्णय घेतात याकडे गुजरातमधील सर्वपक्षीयांचे लक्ष लागले होते. सोमवारी त्यांनी नव्या पक्षाची घोषणा केली. त्यांच्या पक्षाचे नाव गुजरात परिवर्तन पक्ष असणार आहे.
या वर्षाच्या शेवटी गुजरात विधानसभा निवडणूका होणार आहेत. त्यामुळे पटेल यांच्या बंडाला महत्त्व प्राप्त झाले आहे. भारतीय जनता पक्षाने मोदी यांना पुन्हा मुख्यमंत्री पदाचे दावेदार केले आहे तर, प्रमुख विरोधीपक्ष काँग्रेसने अजून आपले पत्ते उघड केलेल नाहीत. अशा परिस्थितीत मोदी विरोधातील भाजप आमदारांचा एक मोठा गट आणि त्यांचे कार्यकर्ते पाठीमागे असल्याचा दावा करणा-या केशुभाईंना विरोधीपक्ष मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार जाहीर करु शकतात.
केशुभाई पटेलांचा भाजपला रामराम नवा पक्ष काढणार
केशुभाई पटेल स्थापणार नवा पक्ष
जोशी - केशुभाई मोदींविरोधात एकत्र?
नवे गणित - मोदी-केशुभाई वाद अभ्यासक्रमातही