आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महिला आमदार 'हनीमून'वरुन परतली, इस्लाम धर्म स्वीकारुन विवाह केल्याने वादंग

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुवाहाटी- माझे काही अपहरण झाले नव्हते. मी माझ्या पतीसोबत त्रिपुरा राज्यात सुटी साजरी करायला गेली होती, असे म्हणणे आहे मागील २२ मे कथितरित्या बेपत्ता असलेल्या ३२ वर्षीय आमदार रुमी नाथ यांचे. रुमी शनिवारी सकाळी आपल्या सरकारी निवासस्थानी पोहचली व त्यानंतर त्यांनी हे स्पष्टीकरण दिले.
चांद-फिजाच्या प्रेम प्रकरणासारखेच आणखी एक प्रकरण सध्या आसाममध्ये गाजत आहे. पहिल्या पतीला घटस्फोट न देता इस्लाम स्वीकारून दुसरा विवाह करणार्‍या काँग्रेस आमदार डॉ. रुमी नाथ (आताच्या रबिया सुलताना) चर्चेत आल्या आहेत.
माध्यमांनी माझ्याबाबतीत चुकीच्या बातम्या दिल्या आहेत. होय मी दुसरे लग्न केले आहे. आणि त्याला माझा पहिला पती हाच कारणीभूत आहे. कारण त्याने मागील तीन वर्षापासून मानसिक व शारिरीक छळ केला होता. मी काहीही चुकीचे केले नाही. तसेच येणा-या प्रत्येक परिस्थितीशी सामना करण्यास मी सक्षम आहे असे रुमी यांनी बोलताना स्पष्ट केले.
एक महिन्यानंतर डॉ. रुमी शनिवारी अवतरल्या. दुसरे लग्न केल्याचे त्यांनी कबूल केले. वकील संघाने त्यांचा हा विवाह बेकायदेशीर ठरवला. त्यांना विधानसभेतून बडतर्फ करण्याची मागणी संघाने केली आहे. डॉ. रुमी भाजपच्या तिकिटावर 2006 मध्ये सर्वप्रथम निवडून आल्या. नंतर बंडखोरी करून 2009 मध्ये त्यांनी काँग्रेसतर्फे निवडणूक लढवली. आता पहिल्या पतीशीच बंड करून त्यांनी परस्पर दुसरा विवाह केला. फेसबुकवरील मित्राच्या प्रेमात पडलेल्या व लग्न करण्यासाठी इस्लाम धर्म स्वीकारणा-या आसाममधील विवाहित महिला आमदार रुमी नाथ यांनी सरकारी नोकरी करणा-या जॉकी जाकिर याच्याही मागील महिन्यात इस्लाम पद्धतीने विवाह केले होता. विवाहानंतर हे दोघे बांग्‍लादेशमध्‍ये पळून गेल्‍याची माहिती होती मात्र तिने आम्ही त्रिपुरा येथे फिरायला गेलो होतो अशी माहिती दिली दिली आहे.
2009 मध्ये हरियाणाचे उपमुख्यमंत्री चंदर मोहन असेच बेपत्ता झाले. नंतर चांद मोहम्मद नाव धारण करून अवतरले तेव्हा त्यांनी अरुराधा बाली ऊर्फ फिझाशी इस्लाम स्वीकारून विवाह केला होता. सध्या हे दोघे विभक्त आहेत.
फेसबुकवरील मित्राशी लग्न करण्यासाठी तिने बदलला धर्म
Video : आसाममधील विवाहित महिला आमदाराने केले पळून जाऊन लग्न
आसामची महिला आमदार फेसबुकवरील प्रेमीसोबत विवाह करुन बांग्‍लादेशला पळाली