आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Kishan On His Way To Become Youngest To Earn Master's Degree ‎

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कर्नाटकच्या विद्यार्थ्याला 16 व्या वर्षीच पदव्युत्तर पदवी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू - कर्नाटकच्या एस.एस. किशन या विद्यार्थ्याने 16 व्या वर्षी मुक्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. किशनने नवव्या वर्षी सातवी परीक्षा उत्तीर्ण होऊन केअर ऑफ फुटपाथ चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. किशनने कर्नाटक मुक्त विद्यापीठातून मास्टर्स इन मल्टिमीडिया अ‍ॅँड अ‍ॅनिमेशन या शाखेचा अभ्यासक्रम पूर्ण केला. लहानपासूनच अभ्यासात गती मिळवलेल्या किशनचा सिंगापूरच्या मीडिया कॉर्पोरेशनने आशियातील 6 प्रतिभावंत मुलांच्या सूचीत समावेश केला होता. त्यानंतर प्रसिद्ध टीव्ही अ‍ॅँकर ऑप्रा विन्फ्रेने त्याला जगातील 10 सर्वाधिक प्रज्ञावंत मुलांमध्ये समावेश केला. सर्वांत कमी वयातील दिग्दर्शनाचा त्याचा विक्रम गिनीज बुकमध्ये नोंदवण्यात आला आहे.