आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुडानकुलम अणुऊर्जा प्रकल्प : पंतप्रधानांच्या वक्तव्याला रशियाकडून दुजोरा

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- रशियाचे नवी दिल्लीतील राजदूत अलेक्सझांडर कडाकिन यांनी कुडानकुलमला अणुऊर्जा प्रकल्पाला अमेरिकास्थित काही स्वयंसेवी संस्था (एनजीओ) अडथळा निर्माण करीत असल्याच्या पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या वक्तव्याला पाठिंबा देत त्यास दुजोरा दिला आहे. गुरुवारी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी भारतीय विकासात अणुऊर्जेची महत्त्वाची भूमिका असून काही एनजीओत खोडा घालत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आज रशियाने त्यास दुजोरा दिला आहे.
रशियाचे नवी दिल्लीतील राजदूत कडाकिन म्हणाले, आम्हालाही याचा संशय होता. पण आता मी उघडपणे हे म्हणू शकतो. फुकोशिमा दुर्घटना झाल्यानंतर सहा महिन्यांनी या एनजीओ अचानकपणे सक्रिय कशा काय झाल्या. या आधी सहा महिने या एनजीओ कुठे होत्या, असा प्रश्नही कडाकिन यांनी सांगितले. कुडानकुलम हा अणुप्रकल्प जगातील सर्वात सुरक्षित व चांगला प्रकल्प असल्याचेही त्यांनी सांगितले.
गुरुवारी एका सायन्स जर्नलला मुलाखत देताना पंतप्रधान सिंग यांनी अणुऊर्जा तयार करण्याला स्वयंसेवी संस्थांचा विरोध असल्याचे म्हटले होते. तसेच या संस्था अमेरिकेतील असून त्यांना भारताने अणुऊर्जा तयार करावी असे वाटत नाही. पण भविष्यातील गरज लक्षात घेता भारतीय विकासात अणुऊर्जेला मोठे महत्त्व असल्याचे सिंग यांनी मुलाखत देताना म्हटले होते.
तीन एनजीओंना निधी- तीन एनजीओंना अणुऊर्जा प्रकल्पविरोधी मोहिमेसाठी परदेशी निधी वळवल्याचा सनसनाटी आरोप पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री व्ही. नारायणसामी यांनी केला आहे. सामाजिक कार्यासाठी देण्यात आलेला निधी कुडानकुलममधील अणुऊर्जा प्रकल्पविरोधी आंदोलन भडकावण्यासाठी वापरण्यात येत असल्याचे गृहमंत्रालयाच्या चौकशीत निष्पन्न झाल्यानंतर कुडानकुलम परिसरातील तीन एनजीओंचे परवाने रद्द करण्यात आले असल्याचे नारायणसामी यांनी सांगितले. या एनजीओंना शारीरिकदृष्ट्या अपंगांना मदत आणि कुष्ठरोग निर्मूलन यासारख्या सामाजिक कार्यासाठी परदेशातून निधी मिळत होता, परंतु या एनजीओ प्रचंड मोठा निधी अणुप्रकल्पविरोधी आंदोलनाला खतपाणी घालण्यासाठी वापरताना आढळून आल्या आहेत. त्यानंतरच सरकारने कारवाई केल्याचे नारायणसामी म्हणाले. प्रकल्पस्थळी जे लोक आंदोलन करीत आहेत, त्यांचे हे आंदोलन गेल्या तीन महिन्यांपासून सुरू आहे. विविध खेड्यांतील लोकांना ट्रकमध्ये भरून आणले जात आहे. त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली जात आहे. ज्या कारणासाठी निधी दिला जातो त्या कारणासाठी त्याचा वापर न करता अन्य कामासाठी निधी वळवून तीन एनजीओंनी एफसीआरए कायद्याचे उल्लंघन केले आहे. अणुप्रकल्पविरोधी मोहिमेबाबत पंतप्रधानांनी गृहमंत्रालयाने केलेल्या चौकशीनंतरच निरीक्षण नोंदवलेले आहे.
कुडानकुलम अणुऊर्जा प्रकल्पात एनजीओंचाच खोडा
कुडानकुलम प्रकल्प तामिळनाडूत समिती
कुडानकुलम काम दोन आठवड्यांत सुरू होणार- पंतप्रधानांची राशियात घोषणा
कुडानकुलम बंद करण्याची वायको यांची मागणी
कुडानकुलम प्रकल्प: आंदोलकांसोबत झालेली बोलणी ठरली निष्फळ
कुडानकुलम अणु प्रकल्पावरून निर्माण झाला तिढा
कुडानकुलम प्रकल्पावर तज्ज्ञांची समिती स्थापन
कुडानकुलम पेटले :वैज्ञानिक, तंत्रज्ञांना रोखले, 2000 लोकांचा रास्ता रोको