आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kumbhamela : Centre And State Not Ready To Accept Responsibiltiy

कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीची प्रकरण: केंद्र व राज्याची जबाबदारवरून तू तू मैं मैं

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलाहाबाद - कुंभमेळ्यादरम्यान रविवारी अलाहाबाद रेल्वे स्थानकावर झालेल्या दुर्घटनेचे राजकारण सुरू झाले आहे. केंद्र व राज्य सरकार एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याच्या पवित्र्यात आहेत.

उत्तर प्रदेश व केंद्र सरकारने घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. उत्तर प्रदेशचे मंत्री व कुंभमेळ्याचे प्रभारी आझम खान यांनी सोमवारी दुर्घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला. मात्र, दुर्घटना कुंभ क्षेत्राबाहेर झाल्याचे सांगत खान यांनी केंद्रावर जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न केला. खान म्हणाले की, दुर्घटना कुंभ क्षेत्राबाहेर झाली आहे. असे असले तरी या घटनेची नैतिक जबाबदारी मी घेतो. रेल्वेमंत्री पवन कुमार बन्सल यांनी घटनेबाबत खुलासा केला. ते म्हणाले की, रेल्वेने संपूर्ण तयारी केली होती. गर्दी वाढल्यामुळे दुर्घटना घडली. रविवारी सायंकाळपासून सोमवारी सकाळपर्यंत अलाहाबादहून 27 विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या आहेत. शेवटी दर दहा मिनिटांना रेल्वे सोडू शकत नाही, असे बन्सल यांनी सांगितले.

मेळ्यावर शोककळा
चेंगराचेंगरीमुळे कुंभमेळ्यावर शोककळा पसरली. रविवारी 22 भाविकांचा मृत्यू झाला होता. सोमवारी उपचारादरम्यान 14 जणांचा मृत्यू झाला. 20 मृतदेहांची ओळख पटली आहे. यामध्ये बिहारचे सहा, उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशचे चार, दिल्लीचे दोन, महाराष्‍ट्राच्या एका व्यक्तीचा समावेश आहे.

उद्घोषणेमुळे गोंधळ
बांद्याचे अजय कुमार म्हणाले की, प्लॅटफॉर्म 4 वरून रेल्वे मिळेल, असे सांगण्यात आले. आम्ही ओव्हरब्रिज ओलांडत होतो, तेवढ्यात प्लॅटफॉर्म 6 वरून रेल्वे सुटणार असल्याची उद्घोषणा झाली. यामुळे संभ्रम निर्माण झाला. सोनिपतच्या प्रवीणने सांगितले की, या घोषणेनंतर लोकांनी पळायला सुरुवात केली.

‘कापडासाठीही पैसे मागितले’
जवळच्या नातेवाइकांची माहिती मिळवण्यासाठी दवाखाने, रेल्वेस्थानकावर फिरावे लागले. मृतदेह ताब्यात घेण्यासाठी अनेक तास वाट पाहावी लागली, असे एका जणाने सांगितले. अन्य एका पीडिताने सांगितले की, मृतदेहासाठी रुग्णवाहिका देण्यास नकार देण्यात आला. मृतदेहावर झाकण्यासाठी कपडाही दिला नाही. आमच्याकडे कपडा नसल्याचे कारण देत अधिका-या ने तो आणण्यास सांगितले. 20- 20 रुपयांचे कापड 1200 रुपयांत देण्यात आले.

नातेवाइकांना 6 लाखांची मदत
रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी एक लाख रुपये व गंभीर जखमींना 50 हजार रुपये मदतीची घोषणा केली. उत्तर प्रदेश सरकारने मृतांच्या नातेवाइकांना पाच लाख रुपये व गंभीर जखमींना दोन लाख रुपये मदत जाहीर केली.