आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कुडानकुलम अणु ऊर्जा प्रकल्प मार्च पासून होणार सुरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


चेन्नई - तामिळनाडूतील कुडानकुलम अणु ऊर्जा प्रकल्पाच्या प्रत्यक्ष ऊर्जा निर्मितीच्या कामाला मार्च महिन्यापासून प्रत्यक्षात सुरुवात होणे अपेक्षित आहे. 1 हजार मेगावॅटच्या पहिल्या युनिटमधून वीज निर्मिती होईल.

भारत-रशिया यांचा हा संयुक्त प्रकल्प आहे. फेब्रुवारी महिन्यातच 1 हजार मेगावॅट प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली आहे. परंतु प्रत्यक्षात त्याच्या विजेच्या वापरासाठी होणारे काम मार्चमध्ये सुरू होणे अपेक्षित असल्याचे सूत्रांनी सांगितले. पहिल्या युनिट 99.7 टक्के एवढ्या क्षमतेने कार्य करत आहेत. डिसेंबर 2012 मध्ये त्याची चाचणी झाली होती. त्यातून ही माहिती मिळाली आहे. रशियाच्या मदतीने हा प्रकल्प तयार करण्यात येत आहे. तो डिसेंबर 2011 मध्येच तयार होऊन सुरू होणे अपेक्षित असताना त्याचे काम वर्षाहून अधिक काळ लांबले. अणु ऊर्जा प्रकल्पाला स्थानिक नागरिकांनी कडवा विरोध केला. ही निदर्शने 500 दिवस चालली होती. प्रकल्पाच्या सुरक्षिततेवरून स्थानिकांसह अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यामुळे प्रकल्पाच्या कामाला पुढे ढकलावे लागले होते. मार्चच्या पहिल्या आठवड्यात प्रकल्पातून वीज निर्मिती सुरू होईल, असे अणु ऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर एम.आर. श्रीनिवासन यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. ते उधगमंडलम येथे बोलत होते. दुस-या युनिटचे काम सप्टेंबरच्या मध्यावर सुरू होईल. प्रकल्पातून गळती होण्याची शक्यता नसल्याचे त्यांनी एका प्रश्नावर बोलताना सांगितले.