आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Kurian Resignation Confirm ; Suranelli Case Affecet

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कुरियन यांचा राजीनामा अटळ ; सूर्यनेल्ली प्रकरण भोवले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सूर्यनेल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणी वादाच्या भोव-यात अडकलेले राज्यसभेचे उपसभापती पी. जे. कुरियन यांच्या राजीनाम्याची शक्यता बळावली आहे. कुरियन यांनी गुरुवारी कॉँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेऊन स्वत:ची बाजू मांडली.

कुरियन यांचा राजीनामा मागितला नसल्याचा दावा त्यांच्या नजीकच्या सूत्रांनी केला आहे. नव्या खुलाशामुळे कुरियन यांचे पद डळमळीत झाले आहे, असे केरळ कॉँग्रेसमधील एका गटाचे म्हणणे आहे. दरम्यान कुरियन यांनी सोनिया गांधी यांच्यासोबत झालेल्या चर्चेचा तपशील दिला नाही. बैठकीत काय चर्चा झाली हे मी तुम्हाला सांगणार नाही, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. उपसभापतिपदाच्या राजीनाम्याची शक्यता आहे काय, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. राज्यसभा सभापती हमीद अन्सारी यांची त्यांनी बुधवारी भेट घेतली होती.

अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच राज्यसभेचे उपसभापतिपद सोडणार
सूर्यनेल्ली येथील एका 16 वर्षीय मुलीचे 1996 मध्ये अपहरण करून तिच्यावर 40 दिवस 42 जणांनी सामूहिक बलात्कार केला होता. या प्रकरणात कुरियन यांच्यावरही आरोप झाले होते. परंतु कुरियन यांची नव्याने चौकशी करण्याची मागणी पीडित मुलीने केली आहे.
वायलर रवी यांचा अगोचरपणा
सूर्यनेल्ली बलात्कार प्रकरणात महिला पत्रकाराला अश्लील वक्तव्य केल्याबद्दल केंद्रीय मंत्री वायलर रवी यांनी माफी मागितली आहे. पत्रकार ज्या टीव्ही वाहिनीत काम करते, त्यांची मी माफी मागितली आहे, असे रवी म्हणाले. महिला पत्रकाराने कुरियन प्रकरणावर त्यांचे मत विचारले होते. त्यावर रवी खोचकपणे म्हणाले, त्यांचे आणि तुमचे वैयक्तिक भांडण आहे काय? का त्यांनी तुम्हाला काही केलंय? यानंतर रवी यांच्या अगोचरपणाबद्दल वाद निर्माण झाला.
राजीनामा का ? : दिल्लीतील सामूहिक बलात्काराच्या प्रकरणानंतर यूपीए सरकार अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या निमित्ताने सभागृहात विरोधकांना प्रथमच सामोरे जात आहे. या अधिवेशनात महिला अत्याचारविरोधी नव्या कायद्याला मंजुरी मिळणे अपेक्षित आहे. या विधेयकावरील चर्चेदरम्यान उपसभापतिपदावरील नेत्यावर अत्याचाराचे आरोप होत असतील तर ते कॉँग्रेससाठी अडचणीचे ठरणार आहे. सरकार विरोधकांना कोणतीही संधी देण्यास तयार नसल्याने कॉँग्रेस कुरियन यांना राजीनामा द्यायला सांगू शकते.
गटबाजी : कॉँग्रेस प्रवक्ते पी. सी. चाको व कुरियन यांचे संबंध फारसे चांगले नाहीत. त्यामुळे चाको यांनी काही दिवसांपूर्वी केरळमध्ये केलेल्या वक्तव्यात पक्ष कुरियन यांच्या पदाबाबत बजेट अधिवेशनापूर्वी निर्णय घेईल, असे म्हटले होते. मात्र, यानंतर दुस-या दिवशी कॉँग्रेस प्रवक्ते संदीप दीक्षित यांनी वेगळी भूमिका मांडत चाको यांचे ते वैयक्तिक मत ठरवले होते.