आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुर्यनेल्ली रेप प्रकरण : कुरिअन सोनियांना भेटले; राजीनामा देण्याची शक्यता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- राज्यसभेचे उपसभापती पी. जे. कुरिअन यांनी गुरूवारी सायंकाळी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली तसेच सुर्यनेल्ली रेप प्रकरणाची माहिती देऊन आपली बाजू मांडली.

याबाबत सांगितले जात आहे, कुरिअन यांना आपल्या पदाचा राजीनामा देण्यास सांगण्यात आले आहे. मात्र, कुरिअन यांच्या जवळच्या सूत्रांनी तसे काहीही नसल्याचे स्पष्ट केले. असे असले तरी सुर्यनेल्ली रेप प्रकरणी आता रोज होत असलेल्या नव्या वेगवेगळ्या खुलाशामुळे कुरिअन यांना पदावर राहणे अवघड आहे. सोनिया गांधी यांच्याशी कुरिअन यांनी सुमारे 20 मिनिटे चर्चा केली. कुरिअन यांनी बुधवारी या प्रकरणावरुन सभापती हामिद अन्सारी यांची भेट घेतली होती.


कुरिअन यांनी या प्रकरणाबाबत सोनियांकडे याआधीच लेखी म्हणणे मांडले होते. त्यात त्यांनी म्हटले आहे की, माझे राजकीय करिअर संपविण्यासाठी माझ्याविरोधात षडयंत्र रचले जात आहे. न्यायव्यवस्थेने मला निर्दोष मुक्त केल्यानंतरही माझ्याविरोधात मुद्दाम रान उठवले जात असल्याचे त्यांनी सोनियांकडे स्पष्ट केले. मात्र संसदेचे अधिवेशन जवळ येऊ लागले असून विरोधकांना आणखी एक मुद्दा मिळू नये, म्हणून सरकार कुरिअन यांना राजीनामा देण्यास सांगू शकते, अशीही दिल्लीत चर्चा आहे.