आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अडवाणींसोबत गडकरींची बंदद्वार चर्चा, यशवंत सिन्‍हाही अध्‍यक्षपदाच्‍या शर्यतीत

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- भारतीय जनता पार्टीच्‍या अध्‍यक्षपदाच्‍या निवडणुकीमध्‍ये अनेक वाद निर्माण होत आहेत. त्‍यातच विद्यमान अध्‍यक्ष नितीन गडकरी यांच्‍या दुस-या टर्ममध्‍येही अडचणी निर्माण झाल्‍या आहेत. प्राप्‍तीकर खात्‍याने आज मुंबई पूर्ती समुहाशी संबंधित कंपन्‍यांवर छापे मारले. तर गडकरींसाठी लालकृष्‍ण अडवाणी यांचे मन वळविण्‍यात राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाला अद्यापही यश मिळालेले नाही. त्‍यामुळे अडवाणींचा विरोध पाहता गडकरींच्‍या दुस-या टर्मवर अद्याप प्रश्‍नचिन्‍हच आहे. दरम्‍यान, मुंबईत नितीन गडकरी आणि लालकृष्‍ण अडवाणी यांच्‍यात बंदद्वार चर्चा झाल्‍याचे वृत्त असून दोन्‍ही नेत्‍यांमध्‍ये सुमारे 15 मिनिटे चर्चा केल्‍याची माहिती आहे. यावेळी संघाचे नेते भैय्याजी जोशीही उ‍पस्थित होते, असे सुत्रांनी सांगितले.

दुसरीकडे भाजपचे ज्‍येष्‍ठ नेते यशवंत सिन्‍हा नितीन गडकरींच्‍या उमेदवारीला आव्‍हान देण्‍याची शक्‍यता आहे. सुत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, सिन्‍हा यांनी उमेदवारी अर्ज मा‍गविला असून ते गडकरींविरुद्ध अध्‍यक्षपदाची निवडणूक लढू शकतात.
नितीन गडकरी यांना अध्‍यक्षपदाची दुसरी टर्म देण्‍यास पक्षातील वरिष्‍ठ नेत्‍यांचा विरोध आहे. त्‍यातच ज्‍येष्‍ठ अधिवक्ते राम जेठमलानी यांचे पुत्र महेश यांनी गडकरींविरोधात अध्‍यक्षपदाची निवडणूक लढविण्‍यासाठी अप्रत्‍यक्ष हालचाली सुरु केल्‍या होत्‍या. परंतु, राष्‍ट्रीय अध्‍यक्षपदाच्‍या निवडणुकीसाठी पक्षाचे किमान 10 वर्षांचे सक्रीय सदस्‍य रहावे लागते, अशी तरतूद असल्‍यामुळे ते अपात्र ठरत असल्‍याचे सुत्रांचे म्‍हणणे आहे. तर स्‍वतः महेश जेठमलानी अध्‍यक्षपदाच्‍या शयर्तीत नसल्‍याचे सांगत आहेत.

दुसरीकडे अडवाणी यांचा गडकरींना विरोध कायम आहे. अडवाणींच्‍या मते, गडकरींच्‍या कंपनीवरील आरोप पक्षासाठी अडचणीचे ठरू शकतात. त्‍यामुळे गडकरींना दुसरी टर्म देणे योग्‍य ठरणार नाही. त्‍यामुळे संघाला अडवाणींची मनधरणी करण्‍यात अपयश आल्‍याचे स्‍पष्‍ट होत आहे. भाजपच्‍या अध्‍यक्षपदाची उद्या निवडणूक होणार असून आज उमेदवारी अर्ज भरण्‍याचा अखेरचा दिवस आहे.