आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lalkrishna Advani Support Sushma Swarja For Party President Nomination

गडकरींच्‍या दुस-या टर्मवर प्रश्‍नचिन्‍ह कायम; अध्‍यक्षपदासाठी सुषमा स्‍वराज यांना अडवाणींचा पाठिंबा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नवी दिल्‍ली- नितीन गडकरी यांना भारतीय जनता पक्षाच्‍या अध्‍यक्षपदी सलग दुस-यांदा बसवण्‍यासाठी राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघ आतुर झाला आहे. मात्र, त्‍यांना विरोध करण्‍यासाठी पक्षातीलच मोठया नेत्‍यांनी कंबर कसल्‍याचे दिसून येत आहे. पक्षाचे ज्‍येष्‍ठ नेते लालकृष्‍ण अडवाणी यांनी सुषमा स्‍वराज यांना पक्षाच्‍या अध्‍यक्षपदी बसवण्‍याचा प्रस्‍ताव ठेवला आहे. सूत्रांकडून मिळालेल्‍या माहितीनुसार संघप्रमूख मोहन भागवत यांनी यासंबंधात शनिवारी अडवाणींशी चर्चा केली आहे.

संयुक्‍त पुरोगामी आघाडीच्‍या सरकारमधील भ्रष्‍टाचाराविरोधातील अभियानाचे नेतृत्‍व करणारे अडवाणी हे गडकरी यांना सलग दुस-यांदा अध्‍यक्षपदी बसवण्‍यास विरोध करणा-या नेत्‍यांपैकी एक आहेत. उल्‍लेखनीय म्‍हणजे गडकरी यांच्‍यावरही भ्रष्‍टाचाराचे आरोप लावण्‍यात आलेले आहेत.

सुषमा स्‍वराज यांची केली वकिली

संघाच्‍या निर्णायक मतानंतरही पक्षात कोणत्‍याही एका नेत्‍यावर अजून एकमत बनू शकलेले नाही. अडवाणी यांनी अचानकपणे सुषमा स्‍वराज यांचे नाव पुढे केले आहे. त्‍यांनी राजनाथ सिंग यांच्‍या नावालाही विरोध केला आहे. सध्‍या सुषमा स्‍वराज या लोकसभेच्‍या विरोधी पक्षनेत्‍या आहेत.