आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Lalkrishna Advani Writes Letter To Prime Minister

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कॅग आयुक्ताची नियुक्ती कॉलिजियममार्फत व्हावीः अडवाणींचे पंतप्रधानांना पत्र

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- निवडणूक व नियंत्रक व महालेखापाल (कॅग) आयुक्तांची नियुक्ती कॉलेजियमद्वारे करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी केली आहे. सध्याची नियुक्ती प्रक्रिया संशयास्पद असून त्यात बदल करणे आवश्यक असल्याचे मत अडवाणी यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना लिहिलेल्या पत्रात व्यक्त केले आहे.
राष्ट्रपतींच्या सल्ल्यानुसार पंतप्रधान निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करतात. या व्यवस्थेवर लोकांचा विश्वास बसत नाही. अशा महत्त्वाच्या निर्णयामध्ये सत्ताधारी पक्षाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरते. या नियुक्त्यांमध्ये भेदभाव होण्याची शक्यता अधिक असते. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या कार्यकाळात एका संशयास्पद व्यक्तिच्या नियुक्तीवरून या प्रक्रियेला डाग लागला होता. त्यामुळे निवडणूक आयोगासह अन्य घटनात्मक संस्थाप्रमुखांच्या नियुक्त्यांमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. सीव्हीसी आणि सीआयसीबाबत जसे बदल करण्यात आले आहेत, तसे बदल अन्य पदांबाबत व्हावेत, असे अडवाणी म्हणाले.
पंतप्रधानांनी कॉलेजियमचे अध्यक्ष व्हावे. देशाचे सरन्यायाधीश, कायदा मंत्री आणि संसदेच्या दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेते यांना सदस्य करण्यात यावे. निवडणूक आयोगाशी संबंधित घटनेच्या कलम 324 मध्ये दुरूस्ती करणे आवश्यक आहे, असा सल्ला अडवाणी यांनी दिला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी या महिनाअखेर निवृत्त होत आहेत. पुढील वर्षी कॅगमधील पद रिक्त होत आहे.