आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वातंत्र्यदिनी आसनव्यवस्थेवरून अडवाणी नाराज

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांना स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम आणि उपराष्ट्रपतिपदाच्या शपथविधी समारंभात पुढच्या रांगेतील आसन न दिल्याबद्दल भाजप नाराज आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी गुरुवारी अडवाणी यांना फोन केला. अशी तक्रार पुन्हा येणार नाही याची काळजी घेतली जाईल, असे आश्वासन राष्ट्रपतींनी त्यांना दिले.
मुखर्जी यांनी या विषयावर अडवाणी, लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरुण जेटली यांच्याशी फोनवर चर्चा केली, असे राष्ट्रपती भवनचे माध्यम सचिव वेणू राजमणी यांनी सांगितले. भविष्यात अशी स्थिती उद्भवणार नाही. आगामी समारंभाबाबत विरोधी पक्षांसोबत चर्चा केली जाईल, असे आश्वासन राष्ट्रपतींनी दिल्याचे राजमणी म्हणाले.
काय आहे प्रकरण ?- राष्ट्रपती भवनाच्या मुगल गार्डनमध्ये बुधवारी आयोजित समारंभात राष्ट्रपतींसोबत पंतप्रधान मनमोहन सिंग आणि यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी यांना बसण्यासाठी खुर्ची ठेवण्यात आली होती. माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांना या वेळी उभे राहावे लागले होते. गेल्या आठवड्यात हमीद अन्सारी यांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या शपथविधी समारंभातही अडवाणी यांना चौथ्या रांगेतील आसन मिळाले होते. जदयू नेते शिवानंद तिवारी यांनी आक्षेप घेतल्यानंतर अडवाणी यांना पुढे बसवण्यात आले.