आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लालू प्रसादांचे सुशीलकुमार मोदींना कुस्तीचे खुले आव्हान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पटना - राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांना आव्हान दिले आहे की, त्यांनी पटना येथील गांधी मैदानात माझ्यासोबत कुस्ती करावी. लालू असेही म्हणले की, 'जो मला म्हातारा म्हणत आहे तो कधीकाळी माझा सचिव होता'. दरभंगा येथील सभेत लालू प्रसाद यादव बोलत होते. सुशील मोदी यांनी दीड महिन्यापूर्वी लालू यांना 'म्हातारा' असे संबोधले होते.
दुसरीकडे भाजप आणि जेडी(यू) यांच्यातील मतभेद वाढत आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपला खुले आव्हान दिले आहे की, "जर आमचा पक्ष सोडून कोणाला जाण्याची इच्छा असेल तर भाजप त्यांना घेऊन जाऊ शकते". माझा या गोष्टीवर काहीही आक्षेप नाही. नितीश कुमार यांनी हे वक्तव्य सोमवारी जनता दरबार संपल्यानंतर केले. भाजपचे बिहार शाखेचे अध्यक्ष डॉ. सीपी ठाकुर यांच्या वक्तव्यावरून नितीश कुमार यांनी हे वक्तव्य केले आहे, असे समजले जात आहे. डॉ. ठाकुर काही दिवसांपूर्वी म्हणाले होते की, जेडी(यू)तील अनेक आमदार आणि खासदार माझ्या संपर्कात आहेत व ते भाजपात येऊ शकतात.