आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लालू यादव यांच्या नातेवाइकाची हत्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा (बिहार)- राजदचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांचे नातेवाईक पंकच ऊर्फ पप्पू यादव (35 ) आणि त्यांचा नोकर बबलू (30) यांची गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली. पंकज यांचा मृतदेह दिघा ठाण्यामागील नाल्यात आढळून आला, तर बबलूचा मृतदेह त्याच्या घरी सापडला. दोघांवरही अत्यंत जवळून गोळ्या झाडण्यात आल्या आहेत.
पंकज यादव हे लालूंच्या पत्नी राबडीदेवी यांचे बंधू सुभाष यादव यांचे मेव्हणे आहेत. ते बिहार विधानपरिषदेचे कर्मचारी असून ते आपल्या एकटेच राहात होते.गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यासोबत नोकर बबलूही राहात होता.पंकज यांचा ट्रान्सपोर्टचाही व्यवसाय आहे.गेल्या काही दिवसांपासून पंकज व त्यांची पत्नी सोनाली सिन्हा यांच्या कुरुबुरी सुरु होत्या.मुलांचा सांभाळ करण्यासाठी त्या काही दिवसांपासून माहेरी राहात आहेत.आठ जुलै रोजी रविवारी पंकज व सोनाली यांच्यात अखेरचे बोलणे झाले. त्याचदिवशी रात्री पंकज यांनी दुसºयांदा फोन केला होता परंतु तो पत्नीला रिसीव्ह करता आला नव्हता. पंकज यांच्या हत्येमागे निकटवर्तीयांचा हात असल्याचा संशय त्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.