आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यूपीचे किंगमेकर लालू

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर प्रदेशात सध्या सतत याच गोष्टीवर चर्चा सुरू आहे की, निवडणूक निकालानंतर कशा प्रकारच्या आघाड्या अस्तित्वात येतील. आधी अखिलेश यादव यांच्या सभेला जमणारी तरुणांची गर्दी पाहून समाजवादी पक्षाला अनुकूल वातावरण असल्याचे सांगण्यात येत होते; पण आता प्रियंका गांधी निवडणुकीच्या मैदानात उतरल्याने समाजवादी पक्ष थोडासा अडचणीत आला आहे. काँग्रेसबाबत सपाचे सौम्य धोरण पाहता निवडणुकीनंतर हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनीच काँग्रेस आणि सपामधील दरी मिटवण्याचा चंग बांधल्याचे सांगण्यात येत आहे. कारण या दोन्ही
पक्षांशी त्यांचे सारखेच लागेबांधे आहेत. लालूंनी समजावल्यानंतर सपाने भाजप आणि बसपविरुद्ध कडक धोरण तसेच ठेवून काँग्रेसबाबत मात्र मुलायम आणि अखिलेश दोघेही सौम्य धोरणाचा अवलंब करीत आहेत. राहुल गांधी आपल्या सुरुवातीच्या प्रचार दौ-यात सपा
आणि मुलायमसिंगांविरुद्ध बरेच काही बोलले असले तरी हे प्रमाण आता बरेच कमी झाले आहे. संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच लालूंनी आपल्या या कामाला सुरुवात केली होती आणि आता त्याची फळे दिसून येत आहेत. जर या निवडणुकीत भाजप आणि बसपचा ‘निकाल’ लागला तर लालू किंगमेकरच्या भूमिकेत दिसतील. नाही तरी बिहारच्या राजकारणात त्यांच्यासाठी सध्या जागा कुठे आहे?