आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांच्या नातेवाईकाची गोळ्या घालून हत्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटना- माजी खासदार सुभाष यादव यांचा मेहूणा पंकजकुमार यादव ऊर्फ पप्पू यादवसह त्याच्या नौकराची गोळ्या घालून हत्या झाल्याचे मंगळवारी उघडकीस आले. पप्पू यादवचा मृतदेह एका मैदानावर तर नौकराचा मृतदेह घरात आढळून आल्याने एकच खळबळ माजली आहे. मयत पप्पु यादव हा ब‍िहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांचा नातेवाईक होता.
पप्पु यादव याचा पाटना येथे ट्रान्सपोर्टचा व्यवसाय होता. अज्ञात हल्लेखोरांनी पप्पुसह त्याचा नौकर बबलुची हत्या करून पसार झाले आहे. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून हल्लेखोराचा शोध घेत आहे. पप्पू यादव याचा मृतदेह मंगळवारी सकाळी दीघा पोलिस ठाण्यामागील मैदानावर आढळून आला. तसेच राजीव नगरातील आकाशवाणी मार्गावरील घरात नौकर बबलुचा मृतदेह पोलिसांना आढळला.